Home /News /sport /

T20 World Cup, IND vs NZ: पुन्हा तसंच घडलं तर....न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी विराटला सतावतेय भीती!

T20 World Cup, IND vs NZ: पुन्हा तसंच घडलं तर....न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी विराटला सतावतेय भीती!

आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) रविवारी टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) या मॅचपूर्वी एक भीती सतावत आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर: आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) रविवारी टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. टीम इंडियासाठी ही 'करो वा मरो' ची लढाई आहे. या मॅचमध्ये पराभव झाल्यास सेमी फायनलचा मार्ग जवळपास बंद होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध पराभव झाल्यानंतरही टीम इंडियाला या स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी आहे. टीम इंडियाचा फॉर्म आणि रेकॉर्ड देखील याला बळ देणारा आहे. पण, कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) या मॅचपूर्वी एक भीती सतावत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुबईमध्ये मॅच होणार आहे. याच मैदानावर पाकिस्ताननं टीम इंडियाचा पराभव केला होता.  दुबईतील मैदानावर टॉस हा महत्त्वाचा घटक आहे. या टी20 वर्ल्ड कपमध्ये दुबईत आत्तापर्यंत 10 मॅच झाल्या आहेत. या प्रत्येक मॅचमध्ये दुसऱ्यांदा बॅटींग करणारी टीम मॅच जिंकली आहे. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या टीमच्या कॅप्टनची इथं पहिल्यांदा फिल्डिंग घेण्यास सर्वाधिक पसंती आहे. मैदानात रात्री पडणाऱ्या दवचा फायदा दुसऱ्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमला होत आहे. विराटचा रेकॉर्ड खराब टॉस हा नशिबाचा खेळ आहे. नशीब कधी कुणाला साथ देईल हे सांगता येत नाही. पण, याबाबतीमध्ये विराटचं नशीब खूपच खराब आहे. टी20, वन-डे आणि टेस्टमधील मागील 15 मॅचमध्ये 14 वेळा विराटनं टॉस गमावला आहे. या टी20 वर्ल्ड कपमधील वॉर्म अप मॅचमध्ये विराटनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस गमावला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धही टॉसचा निर्णय विराटसाठी प्रतिकूल ठरला. गेल्या दोन वर्षांचा रेकॉर्ड पाहिला तर सर्वात जास्त टॉस हरण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावावर आहे. तो या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 35 वेळा टॉस हरला असून फक्त 13 वेळा जिंकला आहे. या यादीत पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 25 वेळा टॉस गमावला आहे. T20 World Cup: बाबर आझमनं तोडला विराट कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड न्यूझीलंडच्या बाजूनं इतिहास टी20 वर्ल्ड कपमध्ये आजवर एकदाही टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करता आलेला नाही. त्याचबरोबर मोठ्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं विजय मिळवला आहे.यामध्ये 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपची सेमी फायनल आणि यावर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलचा समावेश आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: New zealand, T20 world cup, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या