मुंबई, 5 नोव्हेंबर: टीम इंडियानं बुधवारी झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचवर (India vs Afghanistan) वर्चस्व गाजवलं. भारतीय क्रिकेट टीमच्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) तिसऱ्या मॅचमध्ये भारतीय बॅटर्सनी दमदार कामगिरी करत मोठा स्कोअर उभा केला. त्यानंतर भारतीय टीम फिल्डिंगसाठी उतरली तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) आनंदी मुडमध्ये होता. त्यानं फिल्डिंगच्या दरम्यान बॉलिवूडमधील गाण्यावर डान्स देखील केला.
विराट कोहली बाऊंड्रीवर फिल्डिंग करत असताना 'माय नेम इज लखन' या गाण्यावर डान्स करताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. मैदानातील प्रेक्षकांप्रमाणेच विराटनंही या गाण्याचा आनंद घेतला. विराटचा डान्स पाहून प्रेक्षकही चांगलेच खूश झाले. त्यांनी विराट कोहलीला जोरदार दाद दिली. जगातील लोकप्रिय क्रिकेटपटूंमध्ये विराटचा समावेश होतो. त्याला पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्स नेहमी उतावीळ असतात.
विराट कोहलीनं मैदानात डान्स करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कप दरम्यानही कोहली 'गलां गुडियां' गाण्यावर थिरकला होता. त्याचबरोबर पार्टींमध्येही विराटनं केलेल्या डान्सचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत.
Dance of Virat in " My name is Lakhan " song ❤ Love to see our cheeku in happy mood pic.twitter.com/vgBIq927h2
— (@Tarulata_10_18) November 4, 2021
अफगाणिस्ता विरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीला बॅटींग करण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियानं 20 ओव्हरमध्ये तब्बल 210 रन केले आहेत. रोहित शर्मा 74 रन आणि केएल राहुल 69 रन करून आऊट झाले. या दोन्ही ओपनरनी 14.4 ओव्हरमध्ये 140 रनची पार्टनरशीप केली. यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. हार्दिक पांड्याने 13 बॉलमध्ये नाबाद 35 रन आणि ऋषभ पंतने 13 बॉलमध्ये नाबाद 27 रनची खेळी केली.
HBD Virat Kohli: विराटच्या वाढदिवशी अनुष्कानं शेअर केला इमोशनल मेसेज
भारताने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 144 रन करता आल्या. या विजयामुळे भारताच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Virat kohli