मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup 2021: पाकिस्तान विरुद्ध 'या' 11 जणांचा करणार विराट समावेश, पाहा Playing 11

T20 World Cup 2021: पाकिस्तान विरुद्ध 'या' 11 जणांचा करणार विराट समावेश, पाहा Playing 11

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारतीय क्रिकेट टीम पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) खेळणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारतीय क्रिकेट टीम पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) खेळणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारतीय क्रिकेट टीम पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) खेळणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली आहे.  भारतीय टीममध्ये आर. अश्विनचं (R Ashwin) 4 वर्षांनंतर पुनरागमन झालं आहे. 15 सदस्यीय टीममध्ये 6 स्पेशालिस्ट बॅट्सम, तीन ऑल राऊंडर, तर तीन-तीन स्पिनर आणि फास्ट बॉलर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूरचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट टीम पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

ICC स्पर्धेत भारताचा दबदबा

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात शेवटची टी 20 लढत 2016 वर्ल्ड कपमध्ये झाली होती. त्या मॅचमध्ये टीम इंडियानं 6 विकेट्सनं विजय मिळवला होता. दोन्ही टीममध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये आजवर 5 लढती झाल्या आहेत. या सर्व लढतीमध्ये भारतीय टीम विजयी झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवर 8 टी 20 सामने झाले असून त्यापैकी 7 वेळा टीम इंडिया जिंकली आहे. वन-डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये मिळून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 17 सामने झाले असून त्यापैकी 14 वेळा टीम इंडिया विजयी झाली आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील भारतीय टीम पाकिस्तान विरुद्धचा हा रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या निर्धारानं मैदानात उतरेल. या मॅचमध्ये फॉर्मात असलेल्या 11 खेळाडूंना मैदानात उतरवण्यात येईल. यामध्ये काही जणांच्या जागा निश्चित आहेत.

कशी असेल Playing 11?

ओपनिंग बॅट्समन म्हणून रोहित शर्माची जागा नक्की आहे. तर दुसऱ्या जागेसाठी केएल राहुल आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा असेल. या दोन्ही खेळाडूंनी मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये 500 पेक्षा जास्त रन काढले आहेत. या आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्या टप्प्यात इशान किशन फॉर्मात नव्हता. तर राहुलनं 7 मॅचमध्ये 4 अर्धशतकासह 331 रन काढले आहेत. इंग्लंड दौऱ्यावरही राहुलनं चांगली कामगिरी केली आहे.

मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांची जागा नक्की आहे. तर रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे ऑल राऊंडर म्हणून खेळतील. फास्ट बॉलिंगची जबाबदारी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहवर असेल. तर स्पिनर म्हणून अश्विन आणि वरुण चक्रवर्तीचा टीममध्ये समावेश होऊ शकतो.

T20 World Cup 2021: टीम इंडियात मुंबई इंडियन्सचा दबदबा, कॅप्टनसह 6 जणांचा समावेश

पाकिस्तान विरुद्धची संभाव्य भारतीय टीम :  रोहित शर्मा, केएल राहुल/इशान किशन, विराट कोहली (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि  जसप्रीत बुमराह.

First published:

Tags: Cricket news, T20 world cup