मुंबई, 8 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा (New Zealand vs Afghanistan) 8 विकेट्सनं पराभव केला. न्यूझीलंडच्या विजयानं टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये जाण्याची आशा संपुष्टात आली आहे. आता सोमवारी नामिबिया विरुद्धची मॅच खेळण्याची औपचारिकता पूर्ण करुन भारतीय टीम मायदेशी परतणार आहे.
टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येताच कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) एक जुनं ट्विट पून्हा एकदा व्हायरल झालं आहे. 2012 साली झालेल्या आशिया कप स्पर्धेतून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतरचं हे ट्विट आहे. ' उद्या घरी जाणार आहे. चांगलं वाटत नाही.' असं ट्विट तेव्हा विराटनं केलं होतं. क्रिकेट फॅन्सनी 9 वर्ष जुनं हे ट्विट शोधून काढलं असून त्यावर वेगगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
going home tomorrow. not a good feeling .
— Virat Kohli (@imVkohli) March 20, 2012
शनिवारच्या सामन्यात अफगणिस्तानने दिलेलं 125 रनचं आव्हान 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. केन विलियसमन (Kane Williamson) 40 रनवर आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) 36 रनवर नाबाद राहिले. अफगणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेटने मिळाली.
T20 World Cup: जसप्रीत बुमराहवर BCCI नाराज, IPL स्पर्धेबाबत विचारला थेट प्रश्न
या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच मॅचवर पकड बनवली. 19 रनवरच अफगणिस्तानच्या तीन विकेट गेल्या होत्या, पण नजीबुल्लाहने गुलाबदिन आणि मोहम्मद नबीच्या साथीने अफगणिस्तानचा डाव सावरला. नजीबुल्लाहने 48 बॉलमध्ये 73 रन केले. नजीबुल्लाहच्या या खेळीमुळे अफगणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 विकट गमावून 124 रन करता आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india, Viral, Virat kohli