मुंबई, 4 नोव्हेंबर: इंग्लंडचे अंपायर मायकल गॉ (Michael Gough) यांची टी20 वर्ल्ड कपमधून हकालपट्टी (T20 World Cup 2021) करण्यात आली आहे. आता ते उर्वरित स्पर्धेत अंपायरिंग करणार नाहीत. गॉ यांनी स्पर्धेचं बायो-बबल तोडलं होतं. त्यानंतर आयसीसीनं ही कारवाई केली आहे. गॉ गेल्या आठवड्यात कोणतीही परवानगी न घेता हॉटेलच्या बाहेर गेला होता. तसंच त्यांनी बाहेरच्या लोकांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना 6 दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते.
आयसीसीच्या बायो-बबल नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मायकल गॉ यांना टी20 वर्ल्ड कपमधील उर्वरित मॅचमध्ये नियुक्त केले जाणार नाही. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) मॅचमध्ये त्यांच्यावर सामनाअधिकारीची जबाबदारी होती. पण, त्यापूर्वीच त्यांनी नियम मोडल्यानं त्यांना हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या मराइस इरामस यांनी जबाबदारी सांभाळली होती.
इंग्लंडमधील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील माजी अंपायर आणि क्रिकेट विश्वातील आघाडीचे अंपायर असलेले गॉ यांची क्वारंटाईन कालावधीमध्ये एक दिवसाआड तपासणी करण्यात आली. भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच 31 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला होता.
IND vs AFG: 'या' 5 कारणांमुळे मिळाला टीम इंडियाला स्पर्धेतील पहिला विजय
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. बुधवारी अफगाणिस्तानचा 66 रननं पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. अर्थात त्यासाठी टीम इंडियाला स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्धच्या उर्वरित 2 मॅच मोठ्या फरकानं जिंकाव्या लागतील. तसंच अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव करावा अशी प्रार्थना करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, Icc, T20 world cup