• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: मोठ्या मॅचपूर्वी इंग्लंडला धक्का, प्रमुख बॉलर स्पर्धेतून आऊट

T20 World Cup: मोठ्या मॅचपूर्वी इंग्लंडला धक्का, प्रमुख बॉलर स्पर्धेतून आऊट

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) सेमी फायनलला जाणारी पहिली टीम बनलेल्या इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.

 • Share this:
  मुंबई, 4 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) सेमी फायनलला जाणारी पहिली टीम बनलेल्या इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर टायमल मिल्स (Tymal Mills) स्पर्धेतून आऊट झाला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) याची माहिती दिली आहे. मिल्सच्या जागी रिस टोप्लेचा (Reece Topley) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तो यापूर्वी इंग्लंडचा राखीव खेळाडू होता. मिल्स श्रीलंकेविरुद्ध 1.3 ओव्हर बॉलिंग करत दुखापतीमुळे मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर त्याच्या दुखापतीचे स्कॅन ककरण्यात आले. मंगळवारी रात्री ही दुखापत गंभीर असल्याचं समजलं, असं इसीबीनं सांगितलं.  मिल्सनं या स्पर्धेत 4 मॅच खेळल्या असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. मिल्सला 2018 साली दुखापतीमुळेच इंग्लंड टीममधून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर या वर्ल्ड कपमध्ये त्यानं टीममध्ये पुनरागमन केले होते. इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश इंग्लंडनं सोमवारी झालेल्या मॅचमध्ये श्रीलंकेचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडचा या स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. आता त्यांचा एकच सामना शिल्लक आहे.  सोमवारच्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडने जॉस बटलरच्या (Jos Buttler) शतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 163 रनपर्यंत मजल मारली. जॉस बटलरने 67 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले. बटलरच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. T20 World Cup: इंग्लंडच्या अंपायरला चूक भोवली, स्पर्धेतून झाली हकालपट्टी इंग्लंडने दिलेल्या 164 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 19 ओव्हरमध्ये 137 रनवर ऑल आऊट झाला. मोईन अली, आदिल रशीद आणि क्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर क्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगाने सर्वाधिक 34 रन केले.
  Published by:News18 Desk
  First published: