मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: टीम इंडियानं पाकिस्तानपूर्वी स्वीकारलं 'Dologna Candy Challenge', पाहा VIDEO

T20 World Cup: टीम इंडियानं पाकिस्तानपूर्वी स्वीकारलं 'Dologna Candy Challenge', पाहा VIDEO

नेटफ्लिक्सवरील (Netflix) 'स्क्विड गेम' (Squid Game) या लोकप्रिय कोरियाई सीरिजमधील 'डलगोना कँडी चॅलेंज' (Dologna Candy Challenge) टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वीकारले.

  दुबई, 22 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दोन्ही प्रॅक्टीस मॅच जिंकत टीम इंडियानं स्पर्धेची सुरूवात चांगली केली आहे. आता भारतीय क्रिकेट टीमची पहिली मॅच रविवारी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. या मॅचसाठी टीम इंडिया सध्या जोरदार सराव करत आहे. नेटमध्ये टीम इंडियाचे कोच आणि मेंटॉर महेंद्रसिंह धोनीसोबत (MS Dhoni) घाम गाळल्यानंतर भारतीय खेळाडू सोशल मीडियावरील चॅलेंज देखील स्विकारत आहेत. याचा एक व्हिडीओ आयसीसीनं (ICC) शेअर केला आहे. नेटफ्लिक्सवरील (Netflix) 'स्क्विड गेम' (Squid Game) या लोकप्रिय कोरियाई सीरिजमधील 'डलगोना कँडी चॅलेंज' (Dologna Candy Challenge) टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वीकारले. या चॅलेंजमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना कँडीमधील एक आकृती ती न तोडता शोधावी लागते. सध्या सोशल मीडियावर हे चॅलेंज चांगलेच लोकप्रिय आहे. टीम इंडियाकडून रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंनी जगात सध्या चर्चेत असलेलं चॅलेंज स्वीकारलं. यामध्ये वरुण, राहुल, सूर्यकुमार आणि बुमराह यांना अपयश आले. त्यांनी ही आकृती शोधण्याच्या नादात कँडी तोडली. तर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीनं हे चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण केलं.
  View this post on Instagram

  A post shared by ICC (@icc)

  भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव टीम इंडियानं इंग्लंडचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियालाही (India vs Australia Practice Match) धूळ चारली आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं दिलेलं 153 रनचं आव्हान भारताने 9 विकेट राखून पार केलं. रोहित शर्मा 41 बॉलमध्ये 60 रन करून रिटायर्ड हर्ट झाला, तर केएल राहुलने 39 रन केले. सूर्यकुमार यादव 38 रनवर आणि हार्दिक पांड्या 14 रनवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडून फक्त एश्टन अगरला एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 17.5 ओव्हरमध्येच केला. बॉलिवूडचे स्टार कपल खरेदी करणार IPL टीम! शाहरूख, प्रीतीला देणार टक्कर
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: T20 world cup, Team india, Video viral

  पुढील बातम्या