• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup Team India Schedule: टीम इंडियाचं वेळापत्रक नक्की, 'या' टीमशी होणार सामना

T20 World Cup Team India Schedule: टीम इंडियाचं वेळापत्रक नक्की, 'या' टीमशी होणार सामना

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पात्रता फेरी समाप्त झाली आहे. नामिबाया विरुद्ध आयर्लंड (Namibia vs Ireland) या शुक्रवारी झालेल्या मॅचनंतर मुख्य फेरीतील (Super 12) सर्व टीम निश्चित झाल्या आहेत.

  • Share this:
    मुंबई, 23 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पात्रता फेरी समाप्त झाली आहे. नामिबाया विरुद्ध आयर्लंड (Namibia vs Ireland) या शुक्रवारी झालेल्या मॅचनंतर मुख्य फेरीतील (Super 12) सर्व टीम निश्चित झाल्या आहेत.  या मॅचमध्ये नवख्या नामिबियानं आयर्लंडचा 8 विकेट्सनं दणदणीत पराभव करत मुख्य फेरीत (T20 World Cup Super 12) प्रवेश केला आहे. नामिबियानं टीम इंडियाचा समावेश असलेल्या ग्रुप 2 मध्ये समावेश केलाय. या ग्रुपमध्ये स्कॉटलंड या आणखी एका टीमनं पात्रता फेरीतून प्रवेश केलाय.  या दोन्ही टीमच्या समावेशानंतर टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधील संपूर्ण वेळापत्रक नक्की झालं आहे. मुख्य फेरीत टीम इंडियाचा ग्रृप 2 मध्ये समावेश आहे. या ग्रृपमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यासह स्कॉटलंड आणि नामिबिया या टीमचा समावेश आहे. टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. या लढतीकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल. भारत-पाकिस्तान लढतीचा इतिहास हा संपूर्णपणे भारताच्या बाजूनं आहे. दोन्ही देशांमध्ये आजवर टी20 वर्ल्ड कपमध्ये 5 लढती झाल्या असून या सर्व भारतानं जिंकल्या आहेत. 2007 साली पाकिस्तानचाच फायनलमध्ये पराभव करुन टीम इंडियानं पहिल्या टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. आता दुबईमध्ये होणाऱ्या या मॅचमध्ये हा इतिहास कायम ठेवण्याचा विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचा प्रयत्न असेल. T20 World Cup: विराट कोहलीचे 'हे' सहकारी घडवणार इतिहास, पाहा कशी आहे टीम इंडिया टीम इंडियाची दुसरी लढत 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय टीमला ग्रुपमध्ये टॉपवर राहण्यासाठी दुबईत होणारी ही लढत जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियाची तिसरी लढत 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध अबू धाबीमध्ये होणार आहे. त्यानंतर शेवटच्या दोन लढती स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्ध  5 आणि 7 नोव्हेंबर रोजी दुबईत होणार आहे. T20 World Cup चा महासंग्राम; टीम इंडियापासून ऑस्ट्रेलियापर्यंत 'हे' संघ होणार सहभागी 24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता 31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड,  दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता 3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबू धाबी, संध्याकाळी 7.30 वाजता 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-स्कॉटलंड,  दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता 8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया,  दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता 10 नोव्हेंबर- पहिली सेमी फायनल , अबू धाबी, संध्याकाळी 7.30 वाजता 11 नोव्हेंबर- दुसरी सेमी फायनल, अबू धाबी, संध्याकाळी 7.30 वाजता 14 नोव्हेंबर- फायनल,  दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता
    Published by:News18 Desk
    First published: