Home /News /sport /

IND vs NZ: न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी टीम इंडियाची पार्टी, शार्दुल-इशाननं केला धमाल डान्स; VIDEO

IND vs NZ: न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी टीम इंडियाची पार्टी, शार्दुल-इशाननं केला धमाल डान्स; VIDEO

न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचसाठी टीम इंडियाचा (India vs New Zealand) जोरदार सराव सुरू आहे. त्याचवेळी धमाल करण्यातही हे खेळाडू आघाडीवर आहेत.

  दुबई, 31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रविवारी टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) महत्त्वाची मॅच होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या मॅचमध्ये पराभव झाल्यानं टीम इंडियासाठी ही मॅच 'करो वा मरो' स्वरुपाची आहे. या लढतीत पराभव झाल्यास वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय क्रिकेट टीमचं या स्पर्धेतील आव्हान धोक्यात येणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचसाठी टीम इंडियाचा जोरदार सराव सुरू आहे. त्याचवेळी धमाल करण्यातही हे खेळाडू आघाडीवर आहेत. टीम इंडियानं दुबईमध्ये हॅलोविन (Halloween) पार्टी केली. या पार्टीमध्ये सर्व खेळाडू तसंच त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी एकत्र डान्स केला. रोहित शर्माची पत्नी रितिकानं (Ritkia Sajdeh) या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh)

  टीम इंडियाचा विकेट किपर ऋषभ पंतनं (Rishabh Pant) या पार्टीमध्ये लहान मुलांसाठी चॉकलेट आणले होते. ते त्यानं पार्टीतील सर्व बच्चे कंपनीला दिले. रोहित शर्मा, आर. अश्विन यांच्या मुली पंतकडून चॉकलेट घेत असल्याचं एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. टीम इंडियाची परीक्षा टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंडचं टीम इंडियावर एकतर्फी वर्चस्व आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम 2007 आणि 2016 सालच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने होत्या, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे रविवारच्या मॅचमध्ये टीम इंडियाची परीक्षा असणार आहे. T20 World Cup, IND vs NZ: विराट कोहलीची कॅप्टनसी पणाला, न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलण्याचं आव्हान
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Ishan kishan, Shardul Thakur, T20 world cup, Team india, Video viral

  पुढील बातम्या