मुंबई, 8 सप्टेंबर: टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा बुधवारी होणार आहे. या टीममधील 15 पैकी 13 खेळाडूंची नावं पक्की आहेत. उर्वरित 2 जागांसाठीच काही नावांची चर्चा आहे. टीम निवडीबाबत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी मत व्यक्त केलं आहे. माजी भारतीय कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही त्यांची टीम निवडली असून यामध्ये त्यांनी रोहित शर्माचा (Rohit Sharma) ओपनिंग पार्टनर म्हणून केएल राहुलची निवड केलेली नाही. तसंच त्यांनी दोन जणांना या टीममधून वगळलं आहे.
गावसकर हे नेहमीच क्रिकेटच्या सखोल विश्लेषणासाठी ओळखले जातात. त्यांनी रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर म्हणून टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून विराट कोहलीची निवड केली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी 20 सामन्यात रोहित आणि विराटनं टीम इंडियाच्या इनिंगची सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 94 रनची भागिदारी केली होती.
पांड्या बंधूंचा समावेश, दोघांना वगळले
गावसकरांनी या टीममधून शिखर धवन (Shikhar Dhwan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना वगळलं आहे. अतिरिक्त ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांनी केएल राहुलची निवड केली आहे . तिसऱ्या नंबरच्या जागेसाठी सूर्यकुमार यादव (Suryakymar Yadav) योग्य असल्याचं त्यांचं मत आहे. मुंबईकर सूर्यानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण खेळ करत सर्वांनाच प्रभावित केलं आहे. तर चार नंबरसाठी हार्दिक पांड्या आणि पाच नंबरसाठी कृणाल पांड्याला पसंती दिलीय. फास्ट बॉलर्समध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर और शार्दुल ठाकूर यांना टीममध्ये जागा दिली असून युजवेंद्र चहल हा एकमेव स्पिनर त्यांनी निवडला आहे.
'गोल्डन बॉय' चा भाव वाढला! नीरज चोप्राची थेट विराट कोहलीला टशन
सुनील गावसकरांनी निवडलेली टीम इंडिया : रोहित शर्मा, विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, रविंद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार दीपक चाहर, शार्दुल ठाकूर और युजवेंद्र चहल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.