मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup 2021: धोनीची नियुक्ती होताच गावसकरांनी व्यक्त केली भीती! 17 वर्षांपूर्वीच्या घटनेचं दिलं उदाहरण

T20 World Cup 2021: धोनीची नियुक्ती होताच गावसकरांनी व्यक्त केली भीती! 17 वर्षांपूर्वीच्या घटनेचं दिलं उदाहरण

 टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं (T20 World Cup 2021) महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. धोनीची नियुक्ती होताच टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी एक भीती व्यक्त केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं (T20 World Cup 2021) महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनी टीमचा मेंटर म्हणून काम करेल. धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं 3 आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचा हा अनुभव लक्षात घेऊन बीसीसीआयनं त्याची नियुक्ती केली आहे. मात्र धोनीची नियुक्ती होताच टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी एक भीती व्यक्त केली आहे.

गावसकर यांनी टीम इंडियामध्ये धोनीचं पुनरागमन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर एक भीती देखील व्यक्त केली आहे. 'आज तक' वर ते बोलत होते. यावेळी गावसकर यांनी 17 वर्षांपूर्वीचं उदाहरण दिलं आहे. 'मी 2004 साली टीम इंडियाचा सल्लागर म्हणून काम केलं आहे. त्यावेळी टीमचे कोच जॉन राईट (John Wright)  त्याच्या पदाबद्दल चांगलेच काळजीत पडले होते. मी त्यांची जागा घेईल असं त्यांना वाटलं होतं. वास्तविक असं काहीही नव्हतं.

धोनीची नियुक्ती ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. फक्त धोनी आणि शास्त्री यांच्यात कोणत्याही पद्धतीचा संघर्ष होऊ नये अशी आशा केली पाहिजे,' असं गावसकर यांनी स्पष्ट केले.

T20 वर्ल्ड कपमध्ये इशान किशनच्या निवडीनंतर त्याची गर्लफ्रेंड पुन्हा चर्चेत, पाहा HOT PHOTOS

धोनी आणि शास्त्रीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता कमी आहे, असंही गावसकर यांनी सांगितलं. 'धोनीला कोचिंगमध्ये कोणताही रस नाही, हे शास्त्रीला माहिती आहे. धोनी आणि शास्त्री यांचे विचार जुळले तर टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला याचा फायदा होईल. मात्र रणनीतीबाबत त्यांच्यामध्ये कोणते मतभेद झाले तर त्याचा फटका टीमला बसेल. धोनी टीम इंडियासोबत आल्यानं टीमची शक्ती वाढली आहे. त्याच्याकडं अनुभवाची कोणतीही कमतरता नाही. तसंच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक आक्रमक बॅट्समन होता,' असं गावसकर यांनी यावेळी सांगितलं.

First published:

Tags: Cricket news, MS Dhoni