• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर शेन वॉर्न संतापला, दिग्गज खेळाडूची काढली लायकी

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर शेन वॉर्न संतापला, दिग्गज खेळाडूची काढली लायकी

टी20 वर्ल्ड कपमध्ये शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा (England vs Australia) 8 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) चांगलाच संतापला आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा (England vs Australia) 8 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. या मॅचमध्ये टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेली ऑस्ट्रेलियन टीम 125 रनवरच ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन आरोपन फिंचनं सर्वात जास्त 44 रन काढले. डेव्हिड वॉर्नर (1), स्टीव्ह स्मिथ (1) आणि ग्लेन मॅक्सवेल (6) हे ऑस्ट्रेलियन दिग्गज झटपट आऊट झाले. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) चांगलाच नाराज झाला आहे. त्यानं खराब बॅटींगसाठी ऑस्ट्रेलियन टीमवर जोरदार टीका केली आहे. वॉर्ननं ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) विशेष लक्ष्य केलं आहे. स्टीव्ह स्मिथ T20 क्रिकेट खेळण्यास लायक नाही, असं वॉर्नननं म्हंटलं आहे. वॉर्ननं या विषयावर ट्विट करत ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग 11 वर प्रश्न विचारला आहे. 'ऑस्ट्रेलियाकडून निराशाजनक सिलेक्शन. मिचेल मार्शला बाहेर ठेवले आणि मॅक्सवेलला 'पॉवर प्ले' मध्ये पाठवलं. (मॅक्सवेलनं नेहमी 'पॉवर प्ले' च्या नंतर बॅटींग केली पाहिजे) मार्कस स्टॉईनिसला पाठवायला हवं होतं. ऑस्ट्रेलियाची खराब रणनिती. मली स्मिथला खेळताना पाहयला आवडतं. पण तो टी20 टीममध्ये नकोय. स्मिथ टी20 खेळण्यास लायक नाही. त्याच्या जागी मार्शनं  खेळायला हवं होतं.' ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड मॅच रंगतदार होईल अशी आशा होती. पण ऑस्ट्रेलियानं साफ निराशा केली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेलं 126 रनचं आव्हान इंग्लंडने 11.4 ओव्हरमध्येच पार केलं. जॉस बटलरने (Jos Buttler) 32 बॉलमध्ये नाबाद 71 रन केले. 221.88 च्या स्ट्राईक रेटने केलेल्या या खेळीमध्ये बटलरने 5 फोर आणि 5 सिक्स लगावल्या. जेसन रॉयने 22 आणि जॉनी बेयरस्टोने नाबाद 16 रनची खेळी करून बटलरला चांगली साथ दिली. T20 World Cup: इंग्लंडच्या विजयाचे रहस्य उलगडले, कॅप्टन मॉर्गननंच केला खुलासा
  Published by:News18 Desk
  First published: