दुबई, 28 ऑक्टोबर: टी-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (South Africa vs West Indies) यांच्यात झालेल्या मॅचपूर्वी नव्या वादानं आफ्रिकन क्रिकेट हादरलं होतं. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर बॅटर क्विंटन डिकॉकनं (Quinton De Kock) अखेरच्या क्षणी माघार घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंनी प्रत्येक सामन्याआधी गुडघ्यावर बसून ब्लॅक लाईव्हस मॅटर (Black Lives Matter) या मोहिमेला पाठिंबा द्यावा असे आदेश दिले होते. या प्रकारासाठी डि कॉक तयार नव्हता. त्यामुळे त्यानं मॅचमधून माघार घेतली. या प्रकाराबाबत डी कॉकवर अनेकांनी जोरदार टीका केली. दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डानंही त्या विषयावर टीम मॅनेजमेंटकडून अहवाल मागितला आहे. सर्व बाजूंनी अडचणीत आलेल्या डि कॉकनं या वादावर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.
डि कॉकचं संपूर्ण स्पष्टीकरण क्रिकेट साऊथ आफ्रिकेनं सोशल मीडियावर शेअर केलंय. यामध्ये डि कॉक म्हणतो, 'मला माझ्या टीममधील सर्व सहाकारी आणि फॅन्सची सर्वप्रथम माफी मागायची आहे. हा संपूर्ण प्रकार माझ्या भोवती केंद्रीत करण्याची (Quinton Issue) मला इच्छा नव्हती. वंशवादाला विरोध करण्याचे महत्त्व मला माहिती आहे. एक खेळाडू म्हणून मी उदाहरण घालून दिलं पाहिजे, याचीही मला जाणीव आहे.
मी गुडघ्यावर वाकल्यानं इतरांचं शिक्षण होणार असेल तसंच दुसऱ्यांचं आयुष्य चांगलं होत असेल तर ते मी करायला तयार आहे. मला कुणालाही विशेषत: वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना दुखावण्याची इच्छा नव्हती. मंगळवारी सकाळी आमच्यावर अचानक काय लादण्यात आलं याची कुणालाही कल्पना नाही. मी कुणाला दुखावलं असेल तर माफी मागतो. पण, मला आता या विषयावर स्पष्टीकरण द्यायचे आहे.
मी स्वत: 'मिक्स कल्चर'मधून आलो आहे. माझी सावत्र आई ब्लॅक आहे. माझ्यायाठी 'Black Lives Matter' हा मुद्दा जन्मापासून आहे. तो आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला आहे, म्हणून नाही. ज्या व्यक्तींसोबत मी रोज राहतो, वावरतो त्यांच्याबद्दल आदर करण्यासाठी या प्रकारची कृती करणे का आवश्यक आहे? हे मला पटलेलं नाही. पण याबाबत कोणताही चर्चा न करत हा निर्णय तुमच्यावर लादण्यात येत असेल तर त्याचा अर्थ गमावतो असं मला वाटतं.
Quinton de Kock statement 📝 pic.twitter.com/Vtje9yUCO6
— Cricket South Africa (@OfficialCSA) October 28, 2021
मी रेसिस्ट असेल तर तर मी गुडघ्यावर वाकून खोटेपणाचा दिखावा करु शकलो असतो. पण यामधून समाजनिर्मिती होत नाही. माझ्यासोबत जे वाढले आहेत, क्रिकेट खेळले आहेत त्यांना मी एक व्यक्ती म्हणून कसा आहे, हे माहिती आहे. पण ज्यांना काहीही माहिती नाही ते माझ्यावर रेसिस्ट असल्याचा आरोप करत आहेत, याचा मला आणि माझ्या गर्भवती पत्नीला त्रास होतोय.
IPL Auction मधील सर्वात महागड्या खेळाडूनं सोडली देशाकडून खेळण्याची आशा, म्हणाला...
मी खोटं बोलत नाही, पण एका महत्त्वाच्या मॅचपूर्वी काय करावं याचे आम्हाला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. माझं माझ्या सहकाऱ्यांवर प्रेम आहे. दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळण्यापेक्षा कोणतीही गोष्ट मला प्रिय नाही. या सर्व प्रश्नावर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच तोडगा निघाला असता तर बरं झालं असतं.
त्यानंतर या देशाला विजय मिळवून देण्याच्या आमच्या कामावर आम्हाला लक्ष केंद्रीत करता आलं असते. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रकारचा ड्रामा करणे बरोबर नाही. मी माझ्या सहकाऱ्यांचे आणि विशेषत: कॅप्टन तेम्बाचे आभार मानतो. अनेकांच्या लक्षात येणार नाही, पण तो एक जबरदस्त लीडर आहे.
BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची माघार, अडचणीत सापडताच दिला राजीनामा
कॅप्टन, टीम आणि दक्षिण आफ्रिकेला माझी गरज असेल तर या देशासाठी क्रिकेट खेळण्यासारखी माझ्यासाठी कोणतीही आवडती गोष्ट नाही.' असं स्पष्टीकरण डि कॉकनं दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, T20 world cup