• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: 'टीम इंडियाच्या खेळाडूंना झोपेच्या गोळ्या दे', शोएब अख्तरचा बाबरला सल्ला

India vs Pakistan: 'टीम इंडियाच्या खेळाडूंना झोपेच्या गोळ्या दे', शोएब अख्तरचा बाबरला सल्ला

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात दुबईमध्ये टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) महामुकाबला होणार आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoabi Akhtar) ही मॅच जिंकण्यासाठी पाकिस्तानला काही टिप्स दिल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात दुबईमध्ये टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) महामुकाबला होणार आहे. या मॅचपूर्वी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoabi Akhtar) ही मॅच जिंकण्यासाठी पाकिस्तानला काही टिप्स दिल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया आजवर एकदाही पाकिस्तानकडून पराभूत झालेली नाही. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम एकमेकांच्या समोर आल्या होत्या. त्यावेळी टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला होता. 'स्पोर्ट्स क्रीडा'वरील कार्यक्रमात बोलताना शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) काही टिप्स दिल्या आहेत. 1992 पासून आजवर एकदाही वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला विजय मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची सतत थट्टा करण्यात येते. त्यामुळे टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी शोएबनं बाबर आझमला काही मजेशीर टिप्स दिल्या आहेत. अख्तरनं दिलेल्या मजेशीर टीप्स या हायव्होल्टेज मॅचमधील तणाव कमी करणाऱ्या आहेत.  टीम इंडियाच्या खेळाडूंना झोपेच्या गोळ्या द्याव्या, असा पहिला सल्ला शोएबनं बाबर आझमला दिला. विराट कोहलीला 2 दिवस इन्स्टाग्रामचा वापर करु देऊ नकोस हा दुसरा सल्ला शोएबनं दिला आहे. तर महेंद्रसिंह धोनी स्वत: बॅटींगला येणार नाही, याचा प्रयत्न करं असा तिसरा मजेशीर सल्ला शोएबनं बाबर आझमला दिला आहे. पाकिस्तानच्या मॅचपूर्वी धोनीला मिळाली खराब खेळण्याची ऑफर! VIDEO वर्ल्ड कप मॅचमध्ये टीम इंडियाचं पारडं आजवर नेहमीच जड आहे. 1992 च्या वर्ल्ड कपपासून ही भारताच्या विजयाची मालिका सुरू झाली आहे. ती आजपर्यंत नॉन स्टॉप सुरू आहे. वन-डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा 7 वेळा पराभव केलाय. तर टी20 वर्ल्ड कपमध्ये 5 वेळा विजय मिळवला आहे. दोन्ही वर्ल्ड कपमध्ये मिळून भारत-पाकिस्तानमध्ये एकूण 12 मॅच झाल्या असून या सर्व मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: