मुंबई, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं 8 विकेट्सनं (India vs New Zealand) विजय मिळवला. न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॅटर्स अपयशी ठरले. टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये फक्त 110 रन करता आले. न्यूझीलंडनं 111 रनचं आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. या पराभवानंतर भारतीय फॅन्समध्ये निराशा पसरली आहे. तर पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
काय म्हणाला आफ्रिदी?
आफ्रिदीनं टीम इंडियाच्या पराभवानंतर लगेच ट्विट करत मत व्यक्त केलं आहे. 'भारताला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची अजूनही संधी आहे. पण ज्या पद्धतीनं त्यांनी या स्पर्धेतील दोन मोठ्या मॅचमध्ये खेळ केला आहे ते पाहता एखादा चमत्कार झाला तरच ते क्वालिफाय होतील.' असा टोला आफ्रिदीनं लगावला आहे.
India still have an outside chance of qualifying for semis but with how they have played their two big games in the event, it will be nothing but a miracle to see them qualify. @T20WorldCup
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) October 31, 2021
शोएब अख्तरनंही केली टीका
पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनंही (Shoaib Akhtar) टीम इंडियाच्या खेळावर टीका केली आहे. 'मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं की टीम इंडिया अडचणीत येऊ शकते. न्यूझीलंडनं टॉस जिंकला तर अडचण आणखी वाढेल आणि तसंच झालं. भारतीय क्रिकेट टीम अत्यंत खराब खेळली. ते कोणत्याही वेळी मॅचमध्ये नव्हते. त्यांच्यावर मोठा दबाव होता. भारतीय टीमनं ज्या पद्धतीनं खेळ केला ते पाहून मी खूप निराश झालो आहे.
View this post on Instagram
टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी उरलेल्या तीन्ही मॅच मोठ्या फरकानं जिंकाव्या लागतील. त्याचबरोबर अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला तरच टीम इंडियाला सेमी फायनलची संधी आहे.
T20 World Cup: विराटच्या हट्टामुळे झाला टीम इंडियाचा पराभव! कॅप्टनच्या निर्णयांची चर्चा तर होणारच
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shahid Afridi, T20 world cup, Team india