• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs PAK मॅचचं तिकीट फॅननं मागताच आफ्रिदीनं केलं असं काही....VIDEO VIRAL

IND vs PAK मॅचचं तिकीट फॅननं मागताच आफ्रिदीनं केलं असं काही....VIDEO VIRAL

आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC T20 World Cup 2021) रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मॅच होणार आहे. क्रिकेट फॅन्स तिकीट मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार आहेत.

 • Share this:
  दुबई, 22 ऑक्टोबर: आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत  (ICC T20 World Cup 2021) रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मॅच होणार आहे. दोन्ही देशांच्या फॅन्सना या मॅचची मोठी प्रतीक्षा आहे. क्रिकेट फॅन्स तिकीट मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार आहेत. एका उत्साही क्रिकेट फॅननं नुकतचं पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन  शाह आफ्रिदीला (Shaeen Shah Afridi) या मॅचचं तिकीट मागितलं. त्यानंतर आफ्रिदीनं दिलेली प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) झाला आहे. ट्रेनिंगसाठी जाणाऱ्या आफ्रिदीला एका फॅननं शाहीन भाई, तुझ्याकडं भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीट आहे का? असं विचारलं. त्यावर आफ्रिदीनं त्याचे खिसे तपासले, आणि बघुधा खिशात असेल असं सांगून तिथून हसत-हसत निघून गेला. शाहीन आफ्रिदीच नाही तर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीकडं (Virat Kohli) देखील त्याच्या मित्रांनी या मॅचचं तिकीट मागितलं होतं. कोहलीचं याचा खुलासा केला आहे. माझ्यासाठी ही अन्य मॅचप्रमाणेच मॅच आहे. या मॅचला खूप हाईप देण्यात येते हे मला मान्य आहे. सध्या या मॅचच्या तिकीटांचे दर खूप वाढले आहेत, इतकंच मला माहिती आहे. माझे मित्रही माझ्याकडं याची तिकीटं मागत आहेत. पण मी त्यांना यासाठी नकार दिला आहे,' असं विराटनं सांगितलं. T20 World Cup: 'बुमराहपुढे शाहीन आफ्रिदी बच्चा,' पाकिस्तानच्या फास्ट बॉलरनं दिली कबुली भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांची नेहमीच मोठी गर्दी होते. यंदा कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळूनच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तरीही अवघ्या काही तासांमध्ये या मॅचची तिकीट हाऊसफुल झाली आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: