Home /News /sport /

PAK vs AUS LIVE Streaming: T20 वर्ल्ड कपमधील दुसरी सेमी फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?

PAK vs AUS LIVE Streaming: T20 वर्ल्ड कपमधील दुसरी सेमी फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं इंग्लंडचा (England vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे

    दुबई, 11 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं इंग्लंडचा (England vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानची लढत ऑस्ट्रेलियाशी (Pakistan vs Australia) होणार आहे.  पाकिस्तानचा या स्पर्धेत आजवर एकही पराभव झालेला नाही. तर ऑस्ट्रेलियानं इंग्लंड विरुद्ध पराभव स्विकारला आहे. पण, आता सेमी फायनलमध्ये जुना इतिहास कामाला येणार नाही, तर नव्यानं चांगला खेळ करावा लागेल याची दोन्ही टीमला जाणीव आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) मॅचच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना फॉर्मात नसलेल्या फखर झमां आणि हसन अलीचा बचाव केला आहे. हे दोघंही मोठ्या मॅचचे खेळाडू असून नॉक आऊट राऊंडमध्ये चांगली कामगिरी करतील, असा विश्वास बाबरनं व्यक्त केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) यानं टीमला शाहीन आफ्रिदीचा धोका असल्याचं मान्य केलं. या स्पर्धेत मिडल आणि डेथ ओव्हर्समध्ये साधारण सारखेच रन निघाले आहेत. त्यामुळे 'पॉवर प्ले' महत्त्वाचा ठरेल असं फिंचनं सांगितलं. पाकिस्तानचे मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक हे दोन खेळाडू आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्या टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यांच्या खेळण्याचा निर्णय ऐनवेळी घेणार असल्याचं पाकिस्तानच्या मॅनेजमेंटनं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानकडं या दोघांचेही पर्याय उपलब्ध आहेत. गरज पडली तर रिझवानच्या जागी माजी कॅप्टन सर्फराज अहमद आणि मलिकच्या जागी हैदर अली सेमी फायनलमध्ये खेळू शकतो. PAK vs AUS: बाबर आझमला 11 वर्ष जुना बदला घेण्याची संधी किती वाजता सुरू होणार सेमी फायनल? पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यातील दुसरी सेमी फायनल  11 नोव्हेंबर रोजी गुरुवारी दुबईमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल. कुठे होणार लाईव्ह प्रसारण? या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. जिओवरही पाहता येणार मॅच रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना पहिली सेमी फायनल मॅच पाहण्याची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना ही मॅच पाहता येतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Pakistan, T20 world cup

    पुढील बातम्या