मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs NZ LIVE Streaming : T20 वर्ल्ड कपमधील पहिली सेमी फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?

ENG vs NZ LIVE Streaming : T20 वर्ल्ड कपमधील पहिली सेमी फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील टी20 वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल (T20 World Cup 2021, Semi Final) होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील टी20 वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल (T20 World Cup 2021, Semi Final) होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील टी20 वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल (T20 World Cup 2021, Semi Final) होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

अबू धाबी, 10 नोव्हेंबर : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील टी20 वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल (T20 World Cup 2021, Semi Final) होणार आहे. अबू धाबीच्या शेख झायद स्टेडियमवर ही मॅच होणार असून त्याचे क्रिकेट फॅन्सना वेध लागले आहेत. दोन्ही टीमनं सुपर 12 मध्ये 5 पैकी 4 मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडनं स्पर्धेतील पहिली मॅच पाकिस्तान विरुद्ध गमावल्यानंतर सलग 4 मॅच जिंकल्या. तर इंग्लंडनं पहिल्या चार मॅच जिंकल्यानंतर शेवटच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं त्यांचा पराभव केला होता.

दोन वर्षांपूर्वी 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध पराभव न होताही न्यूझीलंडला वर्ल्ड कप विजेतेपद मिळाले नव्हते. दोन्ही देशांमधील फायनल मॅच सुपर ओव्हरमध्येही टाय झाली होती. त्यानंतर इंग्लंडच्या टीमला बाऊंड्रीच्या आधारे विजेता घोषित करण्यात आले. आता सेमी फायनलमध्ये या जखमेवर मलम लावण्याची संधी केन विल्यमसनच्या (Kane Williamson) टीमकडं आहे.

इंग्लंडच्या टीमला या स्पर्धेत दुखापतींचा धक्का बसला आहे. सेमी फायनलपूर्वी या स्पर्धेत चांगली कामगिरी करत असलेला जेसन रॉय दुखापतीमुळे आऊट झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये जॉनी बेअरस्टो जोस बटलरसह इंग्लंडच्या इनिंगची सुरूवात करेल. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी या फास्ट बॉलर्सच्या जोडीसमोर इंग्लंडची परीक्षा होणार आहे.

किती वाजता सुरू होणार सेमी फायनल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील पहिली सेमी फायनल  10 नोव्हेंबर रोजी बुधवारी आबूधाबीमधील शेख झायद स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल.

कुठे होणार लाईव्ह प्रसारण?

 या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.

जिओवरही पाहता येणार मॅच

रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना पहिली सेमी फायनल मॅच पाहण्याची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना ही मॅच पाहता येतील.

ऑस्ट्रेलियानंतर आणखी एक देश करणार पाकिस्तानचा दौरा, 2 मॅच जास्त खेळण्याची घोषणा

इंग्लंडची टीम: इयन मॉर्गन (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोइन अली, डेव्हिड मलान, सॅम बिलिंग्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, जेम्स विन्से, ख्रिस वोक्स, मार्क वूड, टॉम कुरन, रिस टॉपली आणि  डेव्हिड विली.

न्यूझीलंडची टीम:  केन विलियमसन (कॅप्टन), टोड अ‍ॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे,  मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट, ईश सोधी आणि टीम साऊदी

First published:

Tags: England, New zealand, T20 world cup