• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: पाकिस्तान जिंकल्यानंतर स्टेटस ठेवलं 'We Won', नोकरी जाताच शिक्षिका म्हणाली...

India vs Pakistan: पाकिस्तान जिंकल्यानंतर स्टेटस ठेवलं 'We Won', नोकरी जाताच शिक्षिका म्हणाली...

टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये (India vs Pakistan) टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव झाला. टीम इंडियाच्या पराभवानंतर राजस्थानमधील शिक्षिकेनं व्हाटॉ्सअपवर 'we-won' (आम्ही जिंकलो) असं स्टेट्स ठेवलं होतं.

 • Share this:
  मुंबई, 28 ऑक्टोबर:  टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये (India vs Pakistan) टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव झाला. वर्ल्ड कप इतिहासात पाकिस्ताननं पहिल्यांदाच टीम इंडियावर विजय मिळवला. या विजयानंतर राजस्थानमधील शिक्षिकेनं व्हाटॉ्सअपवर 'we-won' (आम्ही जिंकलो) असं स्टेट्स ठेवलं होतं. या शिक्षिकेला हा आनंद चांगलाच महाग पडला आहे. राजस्थानमधील उदयपूरमधील शाळेतील शिक्षिकेनं पाकिस्तानच्या विजयानंतर हे स्टेट्स ठेवलं होतं. त्याचे जोरदार पडसाद उमटले. नफीसा अटारी असं त्यांचं नाव असून त्यांना यानंतर खासगी शाळेनं नोकरीवरुन काढून टाकलं. या प्रकरणात लोकांच्या भावना दुखावल्यानंतर नफीसा यांना बुधवारी अटक करण्यात आली होती.  उदयपूरमधील अंबामाता पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर नफीसा यांनी माफी (Teacher Nafisa Attari apologizes) मागितली आहे. नफीसा यांनी लोकांची नाराजी कमी करण्यासाठी व्हिडीओ प्रकाशित केला आहे. 'आम्ही घरातील सदस्यांची दोन टीममध्ये विभागणी केली होती. आणि आमच्या-आमच्या टीमला पाठिंबा देत होतो. याचा अर्थ असा नाही की मी पाकिस्तान टीमची समर्थक आहे. मी भारतीय आहे. आय लव्ह इंडिया (I Love India) या देशावर मी तितकंच प्रेम करते जितकं तुम्ही सर्व करता,' असं स्पष्टीकरण नफीसा यांनी दिलं आहे. IND vs Pak सामन्यानंतर भारतात फटाके फुटले, सेहवागचा खळबळजनक दावा काय घडला होता प्रकार? उदयपूरच्या नीरजा मोदी शाळेतील शिक्षका असलेल्या नफीसा यांनी टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंच्या फोटोसह 'we won' असे लिहून स्टेटस अपडेट केले होते. या स्टेट्समुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर नफीसा यांच्या स्टेट्सचा स्क्रीन शॉट वेगानं व्हायरल झाला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी शाळेने त्यांना नोकरीवरुन काढत असल्याचं पत्रक जारी केलं आहे. नीरजा मोदी स्कूलच्या शिक्षिका नफीसा अटारी यांना सोजतिया चॅरिटेबल ट्रस्टच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.
  Published by:News18 Desk
  First published: