मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमनं टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला...

T20 वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमनं टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला...

पुढच्या महिन्यात सुरु  होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. या वर्ल्ड कपमध्ये 24 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा महामुकाबला होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 सप्टेंबर : पुढच्या महिन्यात सुरु  होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. या वर्ल्ड कपमध्ये 24 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा महामुकाबला होणार आहे. या दोन्ही टीमनं आजवर एकदा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच या टीम एकमेकांच्या समोर येणार असल्यानं त्याची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.

या महामुकाबल्याच्या पूर्वी  पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने टीम इंडियाला इशारा दिला आहे. 'या मॅचमध्ये आमच्यापेक्षा जास्त दबाव हा भारतीय टीमवर असेल. ही मॅच जिंकून वर्ल्ड कपची सुरूवात विजयानं करण्याचा आमचा प्रयत्न असेल. यूएई हे आमच्या होम ग्राऊंड सारखेच आहे. येथील मैदानावर खेळताना आम्हाला फायदा होतो. इथं आम्ही 100 टक्के योगदान देणार आहोत.' असे बाबरने स्पष्ट केले.

आजवर टीम इंडियाचं वर्चस्व

बाबर आझमनं पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ रझा यांच्याशी बोलताना हे वक्तव्य केले. रझा लवकरच पीसीबीचा अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. बाबरनं भारताविरुद्ध जिंकण्याचा दावा केला असला तरी वर्ल्ड कप इतिहासात आजवर एकदाही पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आलेला नाही. हा इतिहास बदलण्याचं मोठं आव्हान त्याच्या टीमसमोर असेल.

IND vs ENG: 3 भारतीय क्रिकेटपटूंचं करिअर 'या' दौऱ्यानंतर होणार समाप्त!

टी 20 वर्ल्ड कप यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश आहे. हा सातवा टी 20 वर्ल्ड कप आहे. टीम इंडियानं 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली टीम इंडियाला आजवर एकदाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. यंदा ही प्रतीक्षा संपवण्याची संधी टीमला आहे.

First published:

Tags: Babar azam, Cricket news