मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: 2 विजयानंतर बिथरले पाकिस्तानी फॅन्स, न्यूझीलंडविरुद्ध केली हुल्लडबाजी VIDEO

T20 World Cup: 2 विजयानंतर बिथरले पाकिस्तानी फॅन्स, न्यूझीलंडविरुद्ध केली हुल्लडबाजी VIDEO

टीम इंडिया विरुद्धच्या विजयानं हरखून गेलेल्या पाकिस्तानच्या फॅन्सना न्यूझीलंडवरील विजयानंतर (Pakistan vs New Zealand) आणखी एकदा सेलिब्रेशनची संधी मिळाली. शारजाह स्टेडियमधील पाकिस्तानी फॅन्सनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना टार्गेट केले.

  • Published by:  News18 Desk

शारजाह, 27 ऑक्टोबर:  पाकिस्तानच्या क्रिकेट टीमनं मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा (Pakistan vs New Zealand) 5 विकेट्सनं पराभव केला. टीम इंडियाच्या पाठोपाठ आणखी एका बलाढ्य टीमचा पाकिस्ताननं या स्पर्धेत पराभव केला आहे. न्यूझीलंडवरील विजयासह पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग सोपा झालाय. टीम इंडिया विरुद्धच्या विजयानं हरखून गेलेल्या पाकिस्तानच्या फॅन्सना न्यूझीलंडवरील विजयानंतर आणखी एकदा सेलिब्रेशनची संधी मिळाली. शारजाह स्टेडियमधील पाकिस्तानी फॅन्सनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना टार्गेट करत या आनंदाला गालबोट लावलं.

या मॅचच्या दरम्यान पाकिस्तानचे काही फॅन्स ‘Security’ ‘Security’ ‘Security’ अशी घोषणाबाजी करत न्यूझीलंडच्या खेळाडूंना त्रास देत होते. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम हस्तांदोलन करतानाही हे फॅन्स शांत बसले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा न्यूझीलंडला चिडवण्यास सुरूवात केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानची होती खून्नस

या वर्ल्ड कप स्पर्धेच्यापूर्वी न्यूझीलंड टीम पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील पहिली मॅच खेळण्यापूर्वी काही तास आधी न्यूझीलंडनं सुरक्षेच्या कारणामुळे दौरा अर्धवट सोडला. या घटनेमुळे पाकिस्तानचे फॅन्स चांगलेच संतापले होते. त्यामुळेच त्यांनी मॅचच्या दरम्यान न्यूझीलंडच्या खेळाडूंना ‘Security’ च्या मुद्यावर टार्गेट केले.

शारजातील मॅचमध्ये न्यूझीलंडने दिलेलं 135 रनचं आव्हान पाकिस्तानने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पूर्ण केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान काही काळ अडचणीत आलं होतं, पण आसिफ अलीने (Asif Ali) 12 बॉलमध्ये नाबाद 27 रन आणि शोएब मलिकने (Shoaib Malik) नाबाद 26 रन करून पाकिस्तानचा विजय सोपा केला. मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) सर्वाधिक 33 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोदीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर मिचेल सॅन्टनर, टीम साऊदी आणि ट्रेन्ट बोल्ट यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

T20 World Cup: टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध होणार 'करो वा मरो' मुकाबला

First published:

Tags: New zealand, Pakistan, T20 world cup