Home /News /sport /

PAK vs AUS Dream11 Team Prediction: 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं भविष्य

PAK vs AUS Dream11 Team Prediction: 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं भविष्य

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात आज (गुरूवार) टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दुसरी सेमी फायनल होणार आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात आज (गुरूवार) टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दुसरी सेमी फायनल होणार आहे. या मॅचमध्ये जी टीम विजय मिळवेल त्याची लढत 14 नोव्हेंबर रोजी फायनलमध्ये न्यूझीलंडशी होणार आहे. पाकिस्ताननं ग्रुप 2 मधील सर्व मॅच जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियानं ग्रुप 1 मध्ये फक्त इंग्लंड विरुद्ध पराभव स्विकारत सेमी फायनल गाठली आहे. यूएईतील परिस्थितीची पूर्ण माहिती असलेल्या पाकिस्ताननं या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानचे बॅटर्स फॉर्मात आहेत. मात्र त्यांची ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग अटॅकसमोर परीक्षा होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूड आणि अ‍ॅडम झम्पा यांनी या स्पर्धेत दमदार बॉलिंग केली आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क हे अनुभवी बॉलर देखील ऑस्ट्रेलियाकडं आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बॅटींगची भिस्त आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या ओपनिंग जोडीवर आहे. मिचेल मार्शनं वेस्ट इंडिज विरुद्ध अर्धशतक झळकावत फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. या जोडीला ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएल स्पर्धेप्रमाणे खेळ केला तर पाकिस्तानची डोकेदुखी वाढू शकते. पाकिस्तानच्या बॉलिंगची भिस्त शाहीन आफ्रिदीवर आहे. 'पॉवर प्ले' मध्ये आफ्रिदीची बॉलिंग निर्णायक ठरू शकते, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंचनं दिली आहे. Dream11 Team Prediction: कॅप्टन : बाबर आझम व्हाईस कॅप्टन : डेव्हिड वॉर्नर विकेटकिपर : मोहम्मद रिझवान बॅटर्स : बाबर आझम, फखर जमां, डेव्हिड वॉर्नर, स्‍टीव्ह स्मिथ ऑल राऊंडर्स: असीफ अली, ग्लेन मॅक्सवेल बॉलर्स: हॅरीस रौफ, शाहीन आफ्रिदी, जोश हेजलवूड, अ‍ॅडम झम्पा पाकिस्तान फायनलमध्ये जाण्यापूर्वीच अख्तरची बडबड सुरू, न्यूझीलंडला दिला इशारा पाकिस्तानची टीम: बाबर आझम,  शादाब खान, आसिफ अली, फखर जमां, हैदर अली, हॅरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद, शाहीन शाह अफ्रिदी आणि शोएब मलिक. ऑस्ट्रेलियन टीम: : आरोन फिंच (कॅप्टन), अ‍ॅस्टन अगर, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Pakistan, T20 world cup

    पुढील बातम्या