Home /News /sport /

T20 World Cup, PAK vs AUS: बाबर आझमला 11 वर्ष जुना बदला घेण्याची संधी

T20 World Cup, PAK vs AUS: बाबर आझमला 11 वर्ष जुना बदला घेण्याची संधी

बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्त्वाखालील पाकिस्तान टीमनं सर्व मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला 11 वर्षाांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

    दुबई, 11 नोव्हेंबर: बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्त्वाखालील पाकिस्तान टीमनं सर्व मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. टी20 वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup semi final) पाकिस्तानची लढत ऑस्ट्रेलियाशी  (Pakistan vs Australia) होणार आहे. या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला 11 वर्षाांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. टी20 वर्ल्ड कप 2010 मधील सेमी फायनलमध्ये पाकिस्ताननं कमरान अकमल (50) आणि उमर अकमल (नाबाद 56) या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 192 रनचं टार्गेट ठेवलं. ऑस्ट्रेलियाचा अवस्था 17.1 ओव्हरनंतर 7 आऊट 144 होती. 17 बॉलमध्ये 48 रन काढणे आवश्यक होते. त्यावेळी माईक हसीनं 24 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं नाबाद 60 रन काढले आणि ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकून दिली. ती सेमी फायनल खेळणारे डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मोहम्मद हाफिज गुरुवारच्या सेमी फायनलमध्येही खेळणार आहेत. पाकिस्ताननं टीम इंडिया विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवत या स्पर्धेत जोरदार सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड यांचा पराभव केला. सुपर 12 मध्ये एकही मॅच न गमावणारी पाकिस्तान ही एकमेव टीम आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम सध्या फॉर्मात असून त्यानं या स्पर्धेत 264 रन काढले आहेत. पाकिस्तानच्या या मॅचमध्येही बाबरकडून मोठ्या आशा आहेत. ऑस्ट्रेलियाचा बॉलिंग अटॅक मजबूत आहेत. त्यांच्यासमोर कोणतीही चूक केली तर पाकिस्तान अडचणीत येणार आहे. बाबर आणि मोहम्मद रिझवान ही ओपनिंग जोडी अपयशी ठरली तरी पाकिस्तानची मिडल ऑर्डर फॉर्मात आहे. शोएब मलिक, मोहम्मद हाफिज आणि असिफ अली फॉर्मात आहेत. पण फखर जमां अपयशी ठरत असल्यानं पाकिस्तानच्या कॅम्पमध्ये काळजीचं वातावरण आहे. IND vs NZ: टीम इंडियाच्या पराभवानंतर व्यंकटेश अय्यर पडला होता आजारी पाकिस्तानची टीम: बाबर आझम,  शादाब खान, आसिफ अली, फखर जमां, हैदर अली, हॅरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद, शाहीन शाह अफरीदी आणि शोएब मलिक. ऑस्ट्रेलियन टीम: : आरोन फिंच (कॅप्टन), अ‍ॅस्टन अगर, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Babar azam, Pakistan, T20 world cup

    पुढील बातम्या