मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup, PAK vs AFG: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी राशिद खानला सतावतेय हिंसाचाराची भीती

T20 World Cup, PAK vs AFG: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी राशिद खानला सतावतेय हिंसाचाराची भीती

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात लढत होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात लढत होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात लढत होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 29 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात लढत होणार आहे. दुबईमध्ये संध्याकाळी 7.30 मिनिटांनी ही मॅच सुरू होईल. या मॅचमध्ये पाकिस्तान विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या उद्देशानं उतरणार आहे. तर स्पर्धेतील धक्कादायक निकालाची नोंद करण्याचा अफगाणिस्तान प्रयत्न असेल. या मॅचपूर्वी अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खानला (Rashid Khan) हिंसाचाराची भीती सतावत आहे. राशिदनं 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमधील मॅचचा संदर्भ देत फॅन्सना शांततेचं आवाहन केलं आहे.

काय घडला होता प्रकार?

29 जून 2019 रोजी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लीड्सच्या हेंडिग्ले मैदानात वर्ल्ड कप स्पर्धेतील मॅच झाली होती. या मॅचमध्ये दोन्ही टीम्सच्या फॅन्समध्ये मारामारी झाली होती. या भागात एक विमानही उडत होतं. त्यामध्ये बलुचिस्तानला न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती. मॅचमधील पहिल्या इनिंगच्या दरम्यान दोन्ही देशांच्या फॅन्समध्ये मारामारी झाली. त्यानंतर अनेकांना मैदानाच्या बाहेर काढण्यात आले. मॅच संपल्यानंतरही अनेक फॅन्स मैदानात घुसले होते. त्यांनी पाकिस्तानचा फास्ट बॉलर वहाब रियाजवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

राशिदनं केलं आवाहन

टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी राशिद खान म्हणाला की, '2019 वर्ल्ड कपमधील मॅच दरम्यान जे घडलं ते व्हायला नको होतं. जे काही झालं ते आता समाप्त झालं आहे. या लढतीत दोन्ही देशांच्या फॅन्सनी एकजूटता त्यांना पुढे जाण्यास मदत करणार आहे. या प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत.'

टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कोचवर पाकिस्तानची नजर

आयसीसी स्पर्धेत दोन्ही देशांच्या टीममधील शेवटच्या मॅचमध्ये पाकिस्ताननं 3 विकेट्सनं विजय मिळवला होता. राशिद यावेळी पुढे म्हणाला,'आमची आणि पाकिस्तानची मॅच नेहमीच चांगली होते. 2018 साली झालेला आशिया कप किंवा 2019 साली घडलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये ते झालं होतं. या लढतीकडं खेळाच्या भूमिकेतून पाहयला हवं. जी टीम चांगलं खेळेल ती जिंकेल. फॅन्सनी शांततेनं या मॅचचा आनंद घ्यावा. ' असं आवाहन राशिदनं केलं.

First published:

Tags: Afghanistan, Pakistan, T20 world cup