Home /News /sport /

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या कॅप्टनला विचारला तालिबानवर प्रश्न, पाहा नबीनं काय दिलं उत्तर VIDEO

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या कॅप्टनला विचारला तालिबानवर प्रश्न, पाहा नबीनं काय दिलं उत्तर VIDEO

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानचा कॅप्टन मोहम्मद नबीला (Mohamamad Nabi) अफगाणिस्तानमधील बदललेल्या राजवटीवर पत्रकारानं प्रश्न विचारला.

    दुबई, 30 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव (Pakistan vs Afghanistan) केला. अफगाणिस्ताननं या मॅचमध्ये जोरदार लढत दिली, पण 19 व्या ओव्हरमध्ये आसिफ अलीनं 4 सिक्स लगावत (Asif Ali 4 Sixes) पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानचा कॅप्टन मोहम्मद नबीला (Mohamamad Nabi) एका पत्रकारानं अफगाणिस्तानमधील बदललेल्या राजवटीवर आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रश्नावर प्रश्न विचारला. त्यावर नबीनं शांतपणे त्याची बोलती बंद केली. काय विचारला प्रश्न? प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारानं नबीला विचारलं की, 'अफगाणिस्तानची टीम चांगलं खेळत आहे. खूप चांगलं खेळत आहे. दोन्ही मॅचमध्ये तुमची कामगिरी चांगली झाली. पण मागील काळात सरकार बदलल्यानं जी परिस्थिती निर्माण झालीय त्यामुळे तुम्ही परत गेल्यानंतर तुमची चौकशी होईल याचं प्रेशर आहे का?' असा प्रश्न त्यानं विचारला. या पत्रकाराचा इशारा अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारकडं होता. त्यानंतर तो पत्रकार पुढे म्हणाला की, 'या नव्या बदलामुळे पाकिस्तानबरोबरचे तुमचे संबंध चांगले झाले आहेत. या चांगल्या संबंधांंमुळे अफगाणिस्तानच्या टीमला किती फायदा होईल?' नबीनं दिलं उत्तर मोहम्मद नबीनं या प्रश्नाला शांतपणे उत्तर दिलं. 'आपण सध्याची परिस्थिती बाजूला ठेवून फक्त क्रिकेटबद्दल चर्चा करू शकतो. त्यावर पुन्हा पत्रकारानं मी क्रिकेटबाबतच प्रश्न विचारत असल्याचा दावा केला. त्यावर नबी म्हणाला, 'आम्ही इथं वर्ल्ड कप खेळण्यासाठी पूर्ण तयारीसह आलो आहोत. आमच्या टीममध्ये आत्मविश्वास आहे. क्रिकेटच्या बाबतीत कोणता प्रश्न असेल तर तुम्ही विचारु शकता.' T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवावर तालिबानच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला... नबीनं नकार दिल्यानंतरही हा पत्रकार वारंवार अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर प्रश्न विचारण्याता प्रयक्न करत होता. पत्रकार परिषदेतील परिस्थिती गंभीर होत आहे, हे लक्षात येताच आयसीसीच्या अधिकाऱ्यानं हस्तक्षेप करत पत्रकाराला दुसरा प्रश्न विचारण्यास सांगितलं. तरीही पत्रकारानं त्यांचं ऐकलं नाही. त्यानंतर नबी प्रेस कॉन्फरन्समधून निघून गेला.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या