Home /News /sport /

T20 World Cup: बाबर आझमला बसले दोन मोठे धक्के, भारताविरुद्ध सलग सहावा पराभव नक्की!

T20 World Cup: बाबर आझमला बसले दोन मोठे धक्के, भारताविरुद्ध सलग सहावा पराभव नक्की!

T20 World Cup 2021: भारताविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तान टीमला दोन मोठे धक्के बसले आहेत. (Pic. PCB Twitter)

T20 World Cup 2021: भारताविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तान टीमला दोन मोठे धक्के बसले आहेत. (Pic. PCB Twitter)

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारताविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) दोन मोठे धक्के बसले आहेत.

    मुंबई, 21 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021)  भारताविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) दोन मोठे धक्के बसले आहेत. वर्ल्ड कपमधील वॉर्म अप मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा (South Africa beat Pakistan) 6 विकेट्सनं पराभव केला. या पराभवात कॅप्टन बाबर आझमसह पाकिस्तानचे प्रमुख बॅटर फेल गेले. त्यामुळे पाकिस्तान टीमची चिंता वाढली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वॉर्म-अप मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा बाबर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फक्त 15 रन काढून आऊट झाला. त्याचबरोबर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि मोहम्मद हाफिज हे दोघंही फेल गेले. रिझवाननं 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन काढले आहेत. तर हाफिज टीमचा सिनिअर खेळाडू आहे. मोहम्मद रिझवाननं यावर्षी  आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकासह 752 रन काढले आहेत. क्रिकेट विश्वातील अन्य कोणताही बॅटर यावर्षी 600 रनही करु शकलेला नाही. पण तो वर्ल्ड कपमधील दोन्ही वॉर्म-अप मॅचमध्ये फेल गेला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध तो 13 रन काढून आऊट झाला होता. तर बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो 19 रन काढून परतला. मोहम्मद हाफिजकडं 113 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचचा अनुभव आहे. तो सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अनुभवी खेळाडू आहे. पण यावर्षी त्याचा फॉर्म निराशाजनक आहे. त्यानं 14 मॅचमध्ये 12 च्या सरासरीनं फक्त 106 रन काढले आहेत. 32 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. ऑफ स्पिनर म्हणूनही हाफिज अपयशी ठरलाय. त्यानं 14 मॅचमध्ये फक्त 6 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो 13 रन काढून आऊट झाला. मॅक्सवेलला भारी पडली विराटची मैत्री, भारताविरुद्ध झाली फजिती VIDEO पाकिस्तानचा पराभव दक्षिण आफ्रिकेने रस्सी व्हॅन डर डुसेनच्या (Rassie Van Der Dussen) वादळी शतकामुळे बुधवारी झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 19 रनची गरज होती. तेव्हा डुसेन आणि डेव्हिड मिलर (David Miller) यांनी हसन अलीच्या (Hasan Ali) बॉलिंगवर आक्रमण केलं. डुसेन 51 बॉलमध्ये 101 रनवर नाबाद राहिला, तर टेंबा बऊमाने 42 बॉलमध्ये 46 रन केले. पाकिस्तानकडून इमाद वसीम आणि शाहीन आफ्रिदीला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 186 रन केले. फखर झमानने (Fakhar Zaman) 28 बॉलमध्ये 52 रन केले, यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. असीफ अलीने 18 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या