Home /News /sport /

T20 World Cup: सेमी फायनलपूर्वी पाकिस्तानला धक्का, Shoaib आणि Rizwan आजारी, कोरोना टेस्टही झाली!

T20 World Cup: सेमी फायनलपूर्वी पाकिस्तानला धक्का, Shoaib आणि Rizwan आजारी, कोरोना टेस्टही झाली!

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात दुसरी सेमी फायनल होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी फायनलमध्ये उतरण्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का बसला आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : T20 वर्ल्ड कपच्या फायनलमधील  (T20 World Cup 2021 Final) एक टीम ठरली आहे. न्यूझीलंडनं बुधवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडचा (New Zealand vs England) 5 विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता दुसरी टीम आज (गुरुवारी) ठरणार आहे. गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात दुसरी सेमी फायनल होणार आहे. या मॅचमधील विजेता न्यूझीलंड विरुद्ध रविवारी फायनल खेळेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी फायनलमध्ये उतरण्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का बसला आहे. या वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेले मोहम्मद रिझवान  (Mohammad Rizwan) आणि ऑल राऊंडर शोएब मलिक (Shoaib Malik) यांची तब्येत बिघडली आहे. या दोघांनी सेमी फायनलपूर्वी झालेल्या ट्रेनिंग सेशनमध्ये भाग घेतला नाही. याबाबतच्या रिपोर्टनुसार दोन्ही क्रिकेटपटूंना फ्लू झाला आहे. त्यांची कोव्हिड टेस्ट देखील झाली. या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. हे दोघंही सेमी फायनलपूर्वी फिट होतील, असा विश्वास टीम मॅनेजमेंटनं व्यक्त केला आहे. 'क्रिकइन्फो'च्या रिपोर्टनुसार या दोघांना बुधवारी सकाळपासून ताप आहे. त्यामुळे त्यांनी ट्रेनिंग केली नाही. पाकिस्तान मॅनेजमेंट गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्या तब्येतीचा आढावा घेणार आहे. धोनी-रोहितमुळे चर्चेत आला न्यूझीलंडचा मॅच विनर, नव्या जबाबदारीत रचला इतिहास कोण घेणार जागा? पाकिस्तानची टीम या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित आहे. त्यांनी ग्रुप 2 मध्ये सर्व 4 मॅच जिंकल्या. या विजयात रिझवान आणि शोएबचं मोलाचं योगदान आहे. रिझवान या स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तर शोएब मलिकनं न्यूझीलंड आणि स्कॉटलंड वरील विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. स्कॉटलंडविरुद्ध त्यानं या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतकाची बरोबरी केली होती. या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 187 च्या स्ट्राईक रेटनं रन केले आहेत. पाकिस्तानकडं या दोघांचेही पर्याय उपलब्ध आहेत. गरज पडली तर रिझवानच्या जागी माजी कॅप्टन सर्फराज अहमद आणि मलिकच्या जागी हैदर अली सेमी फायनलमध्ये खेळू शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Pakistan, T20 world cup

    पुढील बातम्या