मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: डेव्हिड वॉर्नर DRS न घेता का परतला? ऑस्ट्रेलियन खेळाडूनं सांगितलं कारण

T20 World Cup: डेव्हिड वॉर्नर DRS न घेता का परतला? ऑस्ट्रेलियन खेळाडूनं सांगितलं कारण

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील सेमी फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) केलेल्या घोडचुकीची चर्चा सध्या सर्वत्र आहे. वॉर्नरच्या चुकीचं कारण समोर आलं आहे.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील सेमी फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) केलेल्या घोडचुकीची चर्चा सध्या सर्वत्र आहे. वॉर्नरच्या चुकीचं कारण समोर आलं आहे.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील सेमी फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) केलेल्या घोडचुकीची चर्चा सध्या सर्वत्र आहे. वॉर्नरच्या चुकीचं कारण समोर आलं आहे.

दुबई, 12 नोव्हेंबर : पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील सेमी फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) केलेल्या घोडचुकीची चर्चा सध्या सर्वत्र आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील 11 व्या ओव्हरमध्ये वॉर्नरनं ही चूक केली होती. पाकिस्तानचा स्पिनर शादाब खानच्या (Shadab Khan) बॉलिंगवर वॉर्नर DRS नं घेताच परतला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. आता याचं कारण समोर आलं आहे.

काय घडला प्रकार?

ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानच्या 177 रनचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टनला गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियानं आक्रमक खेळ थांबवला नाही. डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) पाकिस्तानच्या बॉलर्सवर हल्ला चढवला होता. 11 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर शादाब खानच्या बॉलिंगवर (Shadab Khan) वॉर्नर कॅच आऊट असल्याचा निर्णय अंपायरनं दिला. खरं तर त्यावेळी बॉल बॅटला लागला नव्हता. ऑस्ट्रेलियाचे 2 रिव्ह्यू बाकी होते. तरीही वॉर्नरनं रिव्ह्यू घेतला नाही. तो पॅव्हिलियनमध्ये परतला.

वॉर्नरनं 30 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीनं 49 रन काढले. पहिल्या 10 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियानं 3 आऊट 89 रन काढले होते. त्यानंतर 11 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला हा प्रकार घडला. बॉल बॅटपासून दूर असल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. मॅच संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो मॅथ्यू वेड (Mathhew Wade) याने या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

'आमच्याकडं या विषयावर जास्त वेळ नव्हता. माझ्या मते काही तरी आवाज ऐकू आला होता. त्यामुळे वॉर्नरला तो बॉल बॅटला लागला की नाही याची खात्री नव्हती. बॉल बॅटला लागला आहेस असं वॉर्नरला वाटलं नव्हतं. पण नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला आवाज ऐकू आला होता. या परिस्थितीमध्ये नेमकं काय बरोबर आहे, हे समजणे अवघड असते.' असं स्पष्टीकरण वेडनं दिलं आहे.

काय! विराट कोहली 'या' प्रकारातून निवृत्त होणार....वाचा का सुरू झाली चर्चा

मॅथ्यू वेडच्या स्पष्टीकरणानंतर मॅक्सवेलनंच वॉर्नरला DRS न घेण्याचा सल्ला दिला होता, हे स्पष्ट झालं आहे. मॅचच्या रंगतदार वळणावर वॉर्नरची विकेट पडल्यानं पाकिस्तानची बाजू भक्कम झाली होती. मात्र मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉस्टॉयनिसने (Marcus Stoinis) दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

First published:
top videos

    Tags: Australia, David warner, Pakistan, T20 world cup