मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: अफगाणिस्तानच्या मदतीला टीम इंडियाची धाव, अश्विननं दिली मोठी ऑफर

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या मदतीला टीम इंडियाची धाव, अश्विननं दिली मोठी ऑफर

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी होणारी मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा प्रमुख बॉलर आर. अश्विननं (R. Ashwin) या मॅचपूर्वी अफगाणिस्तानला मदतीची ऑफर दिली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी होणारी मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा प्रमुख बॉलर आर. अश्विननं (R. Ashwin) या मॅचपूर्वी अफगाणिस्तानला मदतीची ऑफर दिली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी होणारी मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा प्रमुख बॉलर आर. अश्विननं (R. Ashwin) या मॅचपूर्वी अफगाणिस्तानला मदतीची ऑफर दिली आहे.

मुंबई, 5 नोव्हेंबर:  टीम इंडियानं अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) पराभव करत टी20 वर्ल्ड कपमधील आव्हान कायम ठेवलं आहे. भारतीय क्रिकेट टीमला आता स्कॉटलंड आणि नामिबिया या टीमचा मोठ्या फरकानं पराभव करावा लागेल. पण, सेमी फायमलमध्ये पोहचण्यासाठी इतकं पुरेसं नाही. न्यूझीलंडचा एका मॅचमध्ये पराभव होणे देखील भारतीय टीमसाठी आवश्यक आहे.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी होणारी मॅच टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या विजयासाठी सर्व भारतीय फॅन्स प्रार्थना करणार आहेत. टीम इंडियाचा प्रमुख बॉलर आर. अश्विननं (R. Ashwin) या मॅचपूर्वी अफगाणिस्तानला मदतीची ऑफर दिली आहे.स्कॉटलंड विरुद्धच्या मॅचपूर्वी अश्विननं मजेत हा प्रस्ताव दिला आहे. 'अफगाणिस्तान टीमला शुभेच्छा. मुजीब न्यूझीलंड विरुद्ध खेळणार असेल तर आम्ही त्यांना फिजियोचा सपोर्ट देण्यासाठी देखील तयार आहोत.' असं अश्विननं स्पष्ट केलं.

का दिला अश्विननं प्रस्ताव?

ग्रुप 2 मधून चार विजयासह पाकिस्तानची टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष आहे. टीम इंडियाकडं सध्या 2 पॉईंट्स आहेत. त्यांनी स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला तर 6 पॉईंट्स होतील. तर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानकडं प्रत्येकी 4 पॉईंट्स आहेत. अफगाणिस्तानचा रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे.

त्यामुळे शेवटच्या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं न्यूझाीलंडचा पराभव केला तर न्यूझीलंडचा रनरेट आणखी कमी होईल. त्यानंतर भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमध्ये रन-रेटच्या आधारावर दुसऱ्या जागेचा फैसला होईल. त्या परिस्थितीमध्ये भारतीय टीमनं उर्वरित 2 मॅच जिंकून 6 पॉईंट्सची कमाई केली तर रन-रेटच्या आधारावर सेमी फायनलमध्ये जाण्याची टीम इंडियाला संधी आहे.

विराटच्या 2 इच्छा आज पूर्ण झाल्या तर कॅप्टनला मिळेल सर्वात मोठं बर्थ-डे गिफ्ट

अफगाणिस्तानचा ट्रम्प कार्ड

मुजीब उर रहमानमं या वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंड विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानसोबतही अचूक बॉलिंग करत 1 विकेट घेतली. तो दुखापतीमुळे नामिबिया आणि भारताविरुद्धची मॅच खेळू शकला नाही. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध मुजीब बरा होऊन परतला तर न्यूझीलंडची डोकेदुखी वाढणार आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, New zealand, R ashwin, T20 world cup