मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: न्यूझीलंडच्या रेकॉर्डमुळे वाढली विल्यमसनची चिंता, टीम इंडियाची आशा वाढली

T20 World Cup: न्यूझीलंडच्या रेकॉर्डमुळे वाढली विल्यमसनची चिंता, टीम इंडियाची आशा वाढली

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी होणाऱ्या मॅचची सर्वांना उत्सुकता आहे. या मॅचवरच टीम इंडियाचं स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी होणाऱ्या मॅचची सर्वांना उत्सुकता आहे. या मॅचवरच टीम इंडियाचं स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी होणाऱ्या मॅचची सर्वांना उत्सुकता आहे. या मॅचवरच टीम इंडियाचं स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे.

मुंबई, 6 नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी होणाऱ्या मॅचची सर्वांना उत्सुकता आहे. या मॅचवरच टीम इंडियाचं स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे. अफगाणिस्ताननं ही मॅच जिंकली तर टीम इंडिया सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम राहणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडसाठी ही 'करो वा मरो' ची लढाई आहे. शेवटच्या चार टीममध्ये पोहचण्यासाठी त्यांना अफगाणिस्तान विरुद्धची मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागेल.

न्यूझीलंडची टीम दबावात कोसळते, असा रेकॉर्ड आहे. त्यामुळे त्यांचा कॅप्टन केन विल्यमसनची (Kane Williamson) चिंता वाढली आहे. न्यूझीलंडची टीम आजवर एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकू शकलेली नाही. दोन वेळा त्यांचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं आहे. यापूर्वी 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडनं सेमी फायमलमध्ये न्यूझीलंडचा 7 विकेट्सनं पराभव केला होता. तर 2007 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये त्यांना पाकिस्ताननं 6 विकेट्सनं हरवलं होतं.

2019 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडची टीम फायनलमध्ये पोहचली होती. पण लॉर्ड्स मैदानावर झालेली इंग्लंड विरुद्धची मॅच टाय झाल्यानंतरही कमी फोर लगावल्यानं त्यांचा पराभव झाला होता. टी20 आणि वन-डे स्पर्धांमधील एकूण रेकॉर्ड पाहिला तर क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल या नॉक आऊट मॅचमध्ये न्यूझीलंडनं 44 पैकी फक्त 13 मॅच जिंकल्या आहेत. याचाच अर्थ जवळपास 68 टक्के मॅच त्यांनी गमावल्या आहेत. कोणत्याही मोठ्या टीममध्ये हा सर्वात खराब रेकॉर्ड आहे.

टीम इंडियानं फक्त 39 बॉलमध्ये बदललं स्पर्धेचं चित्र, जाणून घ्या सेमी फायनलचं समीकरण

अलिकडचा रेकॉर्ड

न्यूझीलंडचा अलिकडचा रेकॉर्ड  थोडा चांगला झाला आहे. मागील 6 पैकी 3 नॉक आऊट मॅचमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. 2015 च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये त्यांनी क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलमध्ये विजय मिळवला होता. तर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारला. 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. वन-डे वर्ल्ड कप 2019 च्या सेमी फायनलमध्ये त्यांनी टीम इंडियाला पराभूत केले. तर फायनलमध्ये इंग्लंडनं त्यांना नमवलं.

First published:

Tags: Afghanistan, New zealand, T20 world cup, Team india