मुंबई, 4 सप्टेंबर : पुढील महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) इंग्लंडची डोकेदुखी वाढली आहे.ऑल राऊंडर आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2019 फायनलचा हिरो बेन स्टोक्स (Ben Stokes) या स्पर्धेतून माघार घेणार असल्याचं वृत्त आहे. स्टोक्सनं सध्या मानसिक कारणामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळसाठी ब्रेक घेतला आहे. त्यानं भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज तसंच त्यानंतरची आयपीएल स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेतली आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम निवडण्याची अंतिम तारिख ही 10 सप्टेंबर आहे. बेन स्टोक्सचा सध्या तरी क्रिकेटमध्ये परतण्याचा विचार नाही, अशी माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तींनी दिल्याचं वृत्त 'डेली मेल' नं दिलं आहे. या वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या 15 सदस्यांची घोषणा मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या टेस्टच्या एक दिवस आधी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
बेन स्टोक्सनं 30 जुलै रोजी भारत-इंग्लंड सीरिज सुरू होण्यापूर्वी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. इंग्लंड टीमनंही त्याला यामधून सावरण्यासाठी पूर्ण वेळ देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. स्टोक्सला सावरण्यासाठी जितका वेळ हवा आहे, तितका दिला जाईल. असं सिल्वरवूड यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) यानेही भारताची टेस्ट सीरिज सूरू होण्यापूर्वी हेच सांगितलं होतं.
IND vs ENG: ओव्हल टेस्ट कोण जिंकणार? VVS लक्ष्मणनं केली भविष्यवाणी
'माझ्या मते आम्हाला स्टोक्सच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करावी लागेल. या विषयावर त्याच्यावर दबाव टाकणे योग्य नाही. तो स्वत: खेळण्यासाठी सज्ज आहे हे सांगेपर्यंत वाट पाहण्याची आमची तयारी आहे. . 'या बाबतीमध्ये कोणताही निश्चित कालावधी नाही. मी पुन्हा सांगतो, आमच्यासाठी स्टोक्स आणि त्याचा परिवार निरोगी राहणे आवश्यक आहे. त्यानंतरच तो दमदार पुनरागमन करेल.' असं सिल्वरवूड यांनी लॉर्ड्स टेस्टमधील पराभवानंतर स्पष्ट केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ben stokes, Cricket news, England