• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • NZ vs AFG: टीम इंडियासाठी निर्णायक मॅचमध्ये 'या' टीमनं जिंकला टॉस! पाहा काय घेतला निर्णय

NZ vs AFG: टीम इंडियासाठी निर्णायक मॅचमध्ये 'या' टीमनं जिंकला टॉस! पाहा काय घेतला निर्णय

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) ही टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाची मॅच आता सुरू झाली आहे. टी20 वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचं भवितव्य या मॅचवर अवलंबून आहे.

 • Share this:
  अबू धाबी, 7 नोव्हेंबर:  न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) ही टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाची मॅच आता सुरू झाली आहे. टी20 वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचं भवितव्य या मॅचवर अवलंबून आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मॅचकडं लागलं आहे. या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलला प्रवेश करणारी चौथी टीम कोणती? हे या मॅचनंतर स्पष्ट होणार आहे. ग्रुप 2 मधून पाकिस्ताननं 4 विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा पराभव केला तर त्यांची टीम 8 पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. त्याचबरोबर टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. तर अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव करण्याचा चमत्कार केला तर टीम इंडियाच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या आशा वाढतील. या निर्णायक मॅचमध्ये अफगाणिस्तानचा कॅप्टन मोहम्मद नबी याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा प्रमुख बॉलर मुजीब उर रहमानचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा बॉलिंग अटॅक मजबूत झाला आहे. तर न्यूझीलंडकडच्या टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या स्पर्धेत अफगाणिस्तानची वाटचाल संमिश्र ठरली आहे. स्कॉटलंड आणि नामिबियाचा मोठा पराभव त्यांनी केला. पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या ओव्हर्सपर्यंत ते मॅचमध्ये होते. तर भारताविरुद्ध त्यांचा मोठा पराभव झाला. तर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या पराभवानंतर न्यूझीलंडनं स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्यांनी भारत, स्कॉटलंड आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर न्यूझीलंडचं पारडं जड आहे. मात्र धोकादायक अफगाणिस्तान त्यांच्या अनुभवी स्पिन बॉलर्सच्या जोरावर न्यूझीलंडचा पराभव करतील, अशी अपेक्षा टीम इंडियाच्या फॅन्सची आहे. NZ vs AFG: अफगाणिस्तानवर संपूर्ण देशाची आशा, ट्विटरवर मजेदार Memes Viral न्यूझीलंडची Playing 11:  मार्क चॅपमन, मार्टीन गप्टील, केन विलियमसन (कॅप्टन), डेवॉन कॉनवे, जिमी निशम, टीम सिफर्ट, मिचेल स्टँनर, टीम साऊदी, अ‍ॅडम मिल्ने, इश सोधी आणि ट्रेंट बोल्ट अफगाणिस्तानची Playing 11: हरजतउल्लाह जजाई, मोहम्मद शहजाद, रहमानुल्‍लाह गुरबाज, नजीबुल्लाह जरदान, मोहम्मद नबी (कॅप्टन), गुलबदीन नईब, करीम जनत,  राशिद खान, मुजीब उर रहमान, हमीद हसन आणि नवीन उल हक
  Published by:News18 Desk
  First published: