• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • NZ vs AFG LIVE Streaming: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान लढत कधी आणि कुठे पाहता येणार?

NZ vs AFG LIVE Streaming: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान लढत कधी आणि कुठे पाहता येणार?

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) सेमी फायनलच्या चौथ्या स्थानासाठी भारत (Team India), न्यूझीलंड (New Zealand) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात स्पर्धा आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या वर्ल्ड कपमधील सेमी फायनलच्या 3 टीम ठरल्या आहेत. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia)  तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तानची (Pakistan) टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाली आहे. आता सेमी फायनलच्या चौथ्या स्थानासाठी भारत (Team India), न्यूझीलंड (New Zealand) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात स्पर्धा आहे. न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) या रविवारी होणाऱ्या मॅचनंतर चौथ्या टीमचं चित्र स्पष्ट होणार आहे. न्यूझीलंडनं ही मॅच जिंकली तर ती टीम 8 पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये दाखल होईल. त्याचबरोबर सलग दोन दमदार विजयासह स्पर्धेत पुनरागमन केलेल्या टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल. पण अफगाणिस्ताननं ही मॅच जिंकली तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यासाठी टीम इंडियाला सोमवारी नामिबिया विरुद्ध होणारी मॅच योग्य रनरेटसह जिंकावी लागणार आहे. त्यामुळे या मॅचकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अफगाणिस्तानची स्पिन बॉलिंग धोकादायक आहे. त्यातच गेली दोन मॅच खेळू न शकलेला मुजीब उर रहमान ही परतणार असल्याचं वृत्त असल्यानं अफगाणिस्तानला मोठा दिलासा मिळला आहे. मुजीबसह राशिद खान आणि मोहम्मद नबी हे स्पिनर्स न्यूझीलंडची डोकेदुखी ठरू शकतात. न्यूझीलंडच्या टीमनं पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर सलग तीन मॅच जिंकल्या आहेत. पण, अफगाणिस्तान विरुद्ध पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. T20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री होणार 'या' IPL टीमचे कोच! 2 दिग्गजही करणार मदत किती वाजता सुरू होणार मॅच? न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (NZ vs AFG) यांच्यातील सामना रविवार , 7 नोव्हेंबर रोजी अबुृ धाबीमधील शेख झायद स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 3 वाजता होईल. कुठे होणार लाईव्ह प्रसारण? या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. जिओवरही पाहता येणार मॅच रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना ही मॅच पाहण्याची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक न्यूझीलंड-अफगाणिस्तान मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना ही मॅच पाहता येईल. न्यूझीलंडची टीम: केन विलियमसन (कॅप्टन), टोड अ‍ॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे,  मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट, ईश सोधी आणि टीम साऊदी अफगाणिस्तानची टीम: मोहम्मद नबी (कॅप्टन), अहमद शहजाद, हरजतउल्लाह जजाई, रहमानुल्‍लाह गुरबाज,  नजीबुल्‍लाह जदरान, राशिद खान, गुलबदीन नईब, नवीन उल हक, मुजीब उर रहमान, करीम जनत, फरीद अहमद, हमीद हसन, शराफुद्दीन अशरफ, उस्मान घानी आणि हसमतउल्लाह शाहिदी
  Published by:News18 Desk
  First published: