मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: एकाच बॉलवर 3 वेळा Run Out होताना वाचले खेळाडू, पाहा मजेशीर VIDEO

T20 World Cup: एकाच बॉलवर 3 वेळा Run Out होताना वाचले खेळाडू, पाहा मजेशीर VIDEO

T20 World Cup 2021: एकाच वेळी 3 वेळा रन आऊटची संधी हुकल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. (Pic - ICC Video screenshot)

T20 World Cup 2021: एकाच वेळी 3 वेळा रन आऊटची संधी हुकल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. (Pic - ICC Video screenshot)

क्रिकेटच्या मैदानात कधी-कधी मॅच निर्णायक टप्प्यात आली असताना काही मजेशीर गोष्टी घडतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू देखील इतक्या साध्या चुका करतात की त्यावर विश्वास बसत नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 ऑक्टोबर: क्रिकेटच्या मैदानात कधी-कधी मॅच निर्णायक टप्प्यात आली असताना काही मजेशीर गोष्टी घडतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू देखील इतक्या साध्या चुका करतात की त्यावर विश्वास बसत नाही. शुक्रवारी टी20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत (T20 World Cup qualifying round) नामिबिया विरुद्ध आयर्लंड (Namibia vs Ireland) असाच एक मजेशीर प्रकार घडला. आयर्लंडच्या बॅटींग दरम्यान घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहणाऱ्या सर्वांची हसून पुरेवाट होत आहे.

आयर्लंडच्या इनिंगमधील शेवटच्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. नामिबियाकडून डेव्हिड व्हिसे (David Wiese) बॉलिंग करत होता. या ओव्हरमध्ये आयर्लंडच्या सिमी सिंहनं बॉल मारला आणि तो रन करण्यासाठी पळाला. डेव्हिडनं फिल्डिंग करत बॉल स्टंपच्या दिशेनं टाकला, पण विकेटकिपरला तो अडवता आला नाही.

तो बॉल बाऊंड्रीच्या दिशेनं जात होता पण तिथं फिल्डरनं अडवून पुन्हा एकदा विकेट किपरकडं फेकला. विकेट किपरला पुन्हा एकदा तो बॉल नीट पकडता आला नाही. त्यामुळे आयर्लंडच्या बॅटरला दुसऱ्यांदा जीवदान मिळालं. त्यानंतर किपरनं दुसऱ्या बाजूला बॉल फेकला तिथं दोन फिल्डरांनी प्रयत्न करुनही आयर्लंडच्या खेळाडूला त्यांना रन आऊट करता आलं नाही. या पद्धतीनं एकाच बॉलवर तीन वेळा नामिबियाची रन आऊट करण्याची संधी हुकली आणि आयर्लंडला तीन अतिरिक्त रन मिळाले.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

आयर्लंडला या तीन अतिरिक्त रनचा फायदा झाला नाही. आर्यलंडनं दिलेलं 126 रनचं आव्हान नामिबियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यातच 18.3 ओव्हर्समध्ये आरामात पार केलं. चांगल्या सलामीनंतरही आर्यलंडचा  मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. बिनबाद 62 अशी आश्वासक सुरुवात झाल्यानंतरही आर्यलंडची बॅटींग नंतर ढेपाळली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग (38 ) आणि केविन ओब्रायन (25) ही जोडी परतल्यानंतर कॅप्टन अँड्र्यू बालबीर्नीची (21 ) वगळता अन्य कुणालाचाही नामिबियाच्या बॉलिंगसमोर टिकाव लागला नाही. नामिबियाच्या जॅन फ्रिलिंकने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

T20 World Cup Team India Schedule: टीम इंडियाचं वेळापत्रक नक्की, 'या' टीमशी होणार सामना

126 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नामिबियाला  पहिला धक्का लवकर बसला. क्रेग विल्यम्स 15 रन काढून आऊट झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने सुत्रे आपल्या हातात घेत एकेही-दुहेरी रन काढत आर्यलंडला आणखी यश मिळू दिलं नाही.

First published:

Tags: T20 world cup, Video viral