Home /News /sport /

T20 World Cup 2021: धोनीमुळे बदललं 'या' खेळाडूचं नशीब, एक फोन कॉलमुळे झाली टीम इंडियात एन्ट्री

T20 World Cup 2021: धोनीमुळे बदललं 'या' खेळाडूचं नशीब, एक फोन कॉलमुळे झाली टीम इंडियात एन्ट्री

टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे.

    मुंबई, 22 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. डावखुरा स्पिन बॉलर अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॉलिंग करणार की नाही हे अद्याप स्पष्ट नसल्यानं शार्दुलला टीममध्ये जागा मिळालीय. पण , या निवडीमागे टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) कनेक्शन असल्याचा दावा करण्यात येत आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) याने हा दावा केला आहे. वॉनला टीम इंडियाचा सर्वात मोठा टीकाकार मानलं जातं. पण त्यानं शार्दुलची जोरदार प्रशंसा केली आहे. शार्दुलमध्ये इंग्लंडचा माजी ऑल राऊंडर इयान बोथमची (Ian Botham) छबी पाहयला मिळते, असा दावा वॉननं केला आहे. T20 World Cup: अश्विननं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, विराटला घ्यावी लागणार धोनीची मदत वॉन 'क्रिकबझ'शी बोलताना म्हणाला की, ' मागच्या आठवड्यात मी लॉर्ड बोथमबरोबर होतो. तो खरोखरच लॉर्ड आहे. तो त्याच्या बॉलिंगमुळे मॅचची दिशा बदलतो. हे त्यानं टेस्ट सीरिजमध्ये यापूर्वी केलं आहे. आता आयपीएलमध्ये त्याची पुनरावृत्ती केली आहे. टीम इंडियाचा मेंटॉर त्याचा कॅप्टन होता. माझ्या मते धोनीनं टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) फोन करुन त्यांच्याशी शार्दुलबाबत बोलणे केले असावे. शार्दुलकडं मॅच बदलवण्याची क्षमता आहे.' असे वॉनने स्पष्ट केले. भारतीय टीम: विराट कोहली (कॅप्टन) रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी राखीव : श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: MS Dhoni, Shardul Thakur, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या