मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: BCCI चा मास्टर स्ट्रोक वाया, पहिल्या परीक्षेत धोनी फेल!

T20 World Cup: BCCI चा मास्टर स्ट्रोक वाया, पहिल्या परीक्षेत धोनी फेल!

महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्यात आलं आहे. धोनीच्या नियुक्तीमुळे टीम इंडियाला फायदा मिळेल असं मत व्यक्त केलं जात होतं.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर:  महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्यात आलं आहे. धोनीच्या नियुक्तीमुळे टीम इंडियाला फायदा मिळेल असं मत व्यक्त केलं जात होतं. स्पर्धेतील एक मॅच बाकी असतानाच टीम इंडियांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे भारतीय फॅन्सची आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याची प्रतीक्षा या स्पर्धेतही कायम राहिली आहे.

महेंद्रसिंह धोनी हा आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा एकमेव भारतीय कॅप्टन आहे. त्याचा हा अनुभव लक्षात घेऊन त्याची स्पर्धेसाठी खास नियुक्ती केली होती. टीम इंडियातील अनेक खेळाडूंसोबत त्याने दीर्घकाळ क्रिकेट खेळलं आहे. या स्पर्धेच्या दरम्यानही तो हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, विराट कोहली, वरुण चक्रवर्ती या खेळाडूंसोबत दीर्घकाळ सराव करताना दिसला. पण या खेळाडूंना प्रत्यक्ष मॅचमध्ये कमाल करता आली नाही.

धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमनं आयपीएस स्पर्धेत विजेतेपद (IPL 2021) पटकावले होते. आयपीएलचा सेकंड हाफ यूएईमध्येच झाला होता. यूएईमधील धोनीच्या अनुभवाचा आणि विजेचेपदामुळे उंचावलेल्या आत्मविश्वासाचाही टीम इंडियाला फायदा झाला नाही.

आता द्रविडवर भिस्त

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आळी आहे. द्रविडकडं 2023 पर्यंत जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये धोनीचं टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये पुनरागमन होणे शक्य नाही. त्याचबरोबर टीमला आता दोन कॅप्टन मिळणार आहेत.

शोएब अख्तरला Live Show मधील शायनिंग पडली महाग, पाकिस्तानी चॅनेलनं दिली कोट्यावधींंची नोटीस

या टी20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली टी20 टीमची कॅप्टनसी सोडणार आहे.द्रविडवर 2022 मधील टी20 वर्ल्ड कप, 2023 मधील वन-डे वर्ल्ड कपसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतही टीम इंडियाला विजेतेपद देण्याची जबाबदारी आहे.

First published: