मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: Online Trolling चं लक्ष्य झाल्यानंतर मोहम्मद शमीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

T20 World Cup: Online Trolling चं लक्ष्य झाल्यानंतर मोहम्मद शमीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पराभव झाला. या पराभवानंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammed Shami) चांगलाच ट्रोल झाला होता.

  • Published by:  News18 Desk
दुबई, 29 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पराभव झाला. या पराभवानंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammed Shami) चांगलाच ट्रोल झाला होता. ट्रोलर्सनं शमीला धार्मिक लक्ष्य केलं. त्यानंतर सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शमीला पाठिंबा देत आपण सर्व एकजूट असल्याचा संदेश दिला. या सर्व प्रकरणानंतर मोहम्मद शमीनं पहिल्यांदाच ट्विट केलं आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या ट्रेनिंगचा फोटो शमीनं ट्विट केला आहे. 'ट्रेनिंगमध्ये पुनरागमन. ट्रेनिंग सेशन छान झाले. आमच्या युवा क्रिकेटपटूंशी बोलून बरं वाटलं. न्यूझीलंड विरुद्धच्या पुढच्या मॅचवर पूर्ण फोकस.'शमीनं जो फोटो शेअर केलाय त्यामध्ये तो जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrha) बरोबर चर्चा करताना दिसत आहे. न्यूझीलंड विरुद्ध 'करो वा मरो' लढत पाकिस्ताननं टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धही विजय मिळवला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रविवारी होणारी मॅच टीम इंडियासाठी 'करो वा मरो' असणार आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. यामध्ये पराभूत होणाऱ्या टीमला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नशिबाची मोठी साथ मिळणे आवश्यक असेल. PAK vs AFG: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी राशिद खानला सतावतेय हिंसाचाराची भीती टी20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचा टीम इंडियाविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. दोन देशांमध्ये झालेल्या दोन्ही मॅचमध्ये न्यूझीलंडनं विजय मिळवला आहे. 2016 साली नागपूरमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं भारताचा 47 रननं पराभव केला होता.
First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup

पुढील बातम्या