मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: 'बुमराहपुढे शाहीन आफ्रिदी बच्चा,' पाकिस्तानच्या फास्ट बॉलरनं दिली कबुली

T20 World Cup: 'बुमराहपुढे शाहीन आफ्रिदी बच्चा,' पाकिस्तानच्या फास्ट बॉलरनं दिली कबुली

टीम इंडियाचा अव्वल बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि पाकिस्तानचा अव्वल फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांच्या कौशल्याचीही सध्या तुलना केली जात आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रविवारी होणाऱ्या महामुकाबल्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. या मॅचमध्ये कोण जिंकणार? कोणता खेळाडू चांगली कामगिरी करणार? याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. दोन्ही देशांमध्ये परस्परांच्या खेळाडूंमध्ये तुलना देखील केली जात आहे. टीम इंडियाचा अव्वल बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि पाकिस्तानचा अव्वल फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांच्या कौशल्याचीही सध्या तुलना केली जात आहे. त्यावेळी बुमराहपुढे आफ्रिदी हा पोरगा (बच्चा) असल्याची कबुली पाकिस्तानच्याच फास्ट बॉलरनं दिली आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर (Mohammad Amir) हा 2017 साली पाकिस्ताननं जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा हिरो होता. भारताविरुद्धच्या फायनलमध्ये त्यानं पाकिस्तानच्या विजयात त्यानं निर्णायक भूमिका बजावली होती. यूएईमधील एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं बुमराह आणि शाहीन बद्दल वक्तव्य केलं आहे. ' बुमराह बरोबर आफ्रिदीची तुलना करणे हे मूर्खपणाचे आहे. शाहीन अजून तरूण असून शिकत आहे. तर दुसरीकडं बुमराह गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाकडून खेळतोय. माझ्या मते तो T20 क्रिकेटमधील बेस्ट बॉलर आहे. विशेषत:  डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या बरोबरीचं कुणीही नाही. पण, शाहीन हा पाकिस्तानचा बेस्ट बॉलर आहे. त्यानं गेल्या दीड वर्षांपासून कमाल कामगिरी केली आहे. दोघांमध्ये चांगली लढत होईल. कारण, बुमराह नव्या बॉलनंही चांगली बॉलिंग करतो तर शाहीन अनेक तरुण बॉलरमध्ये सर्वोत्तम आहे.' असं आमिर म्हणाला. टीम इंडियानं पाकिस्तानपूर्वी स्वीकारलं 'Dologna Candy Challenge', पाहा VIDEO बुमराहनं आजवर 50 आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 59 विकेट्स घेतल्यात. तर शाहीन आफ्रिदीनं 32 मॅचमध्ये 30 विकेट्स घेतल्यात. बुमराहला पाकिस्तान विरुद्ध 2 टी20 मॅचचा अनुभव आहे. त्यामध्ये त्यानं 2 विकेट्स घेतल्यात. तर आफ्रिदीनं भारताच्या विरुद्ध आजवर एकही मॅच खेळलेली नाही.
First published:

Tags: India vs Pakistan, Jasprit bumrah, T20 world cup

पुढील बातम्या