मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: 135 दिवस मुलीला पाहिलं नाही, मुंबई इंडियन्सच्या दिग्गजानं सोडली टीमची साथ

T20 World Cup: 135 दिवस मुलीला पाहिलं नाही, मुंबई इंडियन्सच्या दिग्गजानं सोडली टीमची साथ

T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा माजी विजेता असलेल्या श्रीलंका क्रिकेट टीमवर (Sri Lanka Cricket Team) यंदा वर्ल्ड कप स्पर्धेच्या (T20 World Cup 2021) पात्रता फेरीत खेळण्याची वेळ आली होती.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 ऑक्टोबर: T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा माजी विजेता असलेल्या श्रीलंका क्रिकेट टीमवर (Sri Lanka Cricket Team) यंदा वर्ल्ड कप स्पर्धेच्या (T20 World Cup 2021) पात्रता फेरीत खेळण्याची वेळ आली होती. श्रीलंकेनं अधिक नामुष्की टाळत पहिल्या दोन्ही मॅच जिंकत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता श्रीलंका टीम 23 तारखेपासून सुरू होणाऱ्या सुपर 12 (Super 12) फेरीत खेळणार आहे. मुख्य फेरीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकेला धक्का बसलाय. त्यांचा माजी कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) श्रीलंका टीमची साथ सोडणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जयवर्धने मार्गदर्शक म्हणून श्रीलंका टीममध्ये दाखल झाला होता. त्याच्या मार्गदर्शनाची खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनं प्रशंसा केली आहे. 'हा अवघड निर्णय' श्रीलंकेची पात्रता फेरीतील एक मॅच आणखी बाकी आहे. या मॅचपूर्वी बोलताना जयवर्धने म्हणाला की, 'हा एक अतिशय अवघड निर्णय आहे. पण जून महिन्यापासून मी सतत बायो-बबलमध्ये आहे. मी बायो-बबलमध्ये 135 दिवस पूर्ण केले आहेत. एक वडील म्हणून मुलीला न भेटण्याचं माझं दु:ख तुम्ही समजू शकता. मी आता मायदेशी परतणार आहे. पण तंत्रज्ञानाच्या मदतीनं टीमला गरज भासली तर मी उपलब्ध असेल.' डिविलियर्सची World Cup खेळण्याची ऑफर का फेटाळली? अखेर कारण झालं उघड जयवर्धेने इंग्लंडमध्ये झालेल्या द हंड्रेड (The Hundred) स्पर्धेतील साऊथर्न ब्रेव्ह (Southern Brave) टीमचा कोच होता. या टीमनं जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावले. या स्पर्धेनंतर लगेच तो यूएईमध्ये आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफसाठी (IPL 2021, Phase 2) दाखल झाला. या स्पर्धेत त्यानं मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन केले. त्यानंतर टी20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत त्यानं श्रीलंका टीमचा सल्लागार म्हणून भूमिका बजावली. श्रीलंकेची पात्रता फेरीतील शेवटची मॅच शुक्रवारी नेदरलँड विरुद्ध होणार आहे. मुख्य फेरीआधील ही शेवटची मॅच मोठ्या फरकानं जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
First published:

Tags: Cricket news, Sri lanka, T20 world cup

पुढील बातम्या