Home /News /sport /

T20 World Cup, ENG vs NZ: न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं का केलं नाही विजयाचं सेलिब्रेशन? जाणून घ्या कारण

T20 World Cup, ENG vs NZ: न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं का केलं नाही विजयाचं सेलिब्रेशन? जाणून घ्या कारण

डॅरेल मिचेलनं (Darell Mitchell) 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार लगावत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानंचर न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचं वातावरण होतं, पण त्यांच्या ऑल राऊंडरनं कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) न्यूझीलंडनं इंग्लंडचा 5 विकेट्सनं पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं 167 रनचं आव्हान न्यूझीलंडनं 6 बॉल आणि 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. डॅरेल मिचेलनं (Darell Mitchell) 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार लगावत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी न्यूझीलंडच्या संपूर्ण ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. काही खेळाडूंनी उडी मारत आनंद व्यक्त केला. तर काही जण एकमेकांची गळाभेट घेत होते. न्यूझीलंडच्या टीममध्ये आनंदाचं वातावरण असताना त्यांचा ऑल राऊंडर जेम्स नीशम (James Neesham) खूर्चीवर शांत बसला होता. त्याचा चेहरा स्थिर होता. त्यावरील हावभाव बदलले नाहीत. तसंच त्यानं कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. नीशमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नाीशमनं या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. अजूनही काम पूर्ण झालेलं नाही, असं ट्विट नीशमनं केलं आहे. नीशममुळे पलटली बाजी 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी टीमची अवस्था बिकट झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या, पण डॅरेल मिचेलने (Darell Mitchell) डेवॉन कॉनवेसोबत (Devon Conway) पार्टनरशीप करून न्यूझीलंडला सावरलं. मिचेल 47 बॉलमध्ये 72 रनवर नाबाद राहिला, तर कॉनवे 46 रनवर आऊट झाला. कॉनवेची विकेट गेल्यानंतर इंग्लंडची टीम पुनरागमन करेल असं वाटत होतं, पण जेम्स नीशमने (James Neesham) आक्रमण केलं. नीशमने 11 बॉलमध्ये 27 रन केले, यामध्ये 3 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. सेमी फायनलपूर्वी पाकिस्तानला धक्का, Shoaib आणि Rizwan आजारी, कोरोना टेस्टही झाली! 14 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या दोन टीममध्ये गुरुवारी दुसरी सेमी फायनल रंगणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: England, New zealand, T20 world cup

    पुढील बातम्या