मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SCO LIVE Streaming: भारत विरुद्ध स्कॉटलंड लढत कधी आणि कुठे पाहता येणार?

IND vs SCO LIVE Streaming: भारत विरुद्ध स्कॉटलंड लढत कधी आणि कुठे पाहता येणार?

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी टीम इंडियाची लढत स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध होणार आहे. अफगाणिस्तानचा 66 रननं पराभव करत भारतीय टीमनं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी टीम इंडियाची लढत स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध होणार आहे. अफगाणिस्तानचा 66 रननं पराभव करत भारतीय टीमनं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी टीम इंडियाची लढत स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध होणार आहे. अफगाणिस्तानचा 66 रननं पराभव करत भारतीय टीमनं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

मुंबई, 5 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी टीम इंडियाची लढत स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध होणार आहे. अफगाणिस्तानचा 66 रननं पराभव करत भारतीय टीमनं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. आता या स्पर्धेतील प्रत्येक लढत टीम इंडियासाठी 'करो वा मरो' स्वरुपाची असून त्यामध्ये मोठ्या फरकानं विजय मिळवणे देखील आवश्यक आहे.

ग्रुप 2 मधून पाकिस्ताननं चार विजयासह यापूर्वीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंडची टीम 2 विजयासह सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी न्यूझीलंडच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागेल. नामिबिया किंवा अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला तर टीम इंडियाचं काम सोपं होणार आहे. अर्थात टीम इंडियाला सर्वात प्रथम त्यांच्या हातामध्ये आहेत त्या गोष्टी करणे आवश्यक आहेत.त्यामुळे स्कॉटलंड विरुद्ध मोठ्यात मोठा विजय मिळवण्याचं भारतीय टीमसमोर आव्हान असेल.

किती वाजता सुरू होणार मॅच?

भारत विरुद्ध स्कॉटलंड (IND vs SCO) यांच्यातील सामना 5 नोव्हेंबर रोजी दुबईमधील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल.

कुठे होणार लाईव्ह प्रसारण?

या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध स्कॉटलंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.

जिओवरही पाहता येणार मॅच

रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना ही मॅच पाहण्याची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक भारत-स्कॉटलंड मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना ही मॅच पाहता येतील.

वेस्ट इंडिजच्या पराभवाचा बड्या खेळाडूला धक्का, निवृत्तीची केली घोषणा

भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

First published:
top videos

    Tags: T20 world cup, Team india