मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: भारत आणि पाकिस्तानमध्ये कोण आहे दुबईचा किंग? वाचा महामुकाबल्याचा Ground Report

T20 World Cup: भारत आणि पाकिस्तानमध्ये कोण आहे दुबईचा किंग? वाचा महामुकाबल्याचा Ground Report

टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) टीम इंडिया (Team India) आपल्या अभियानाची सुरुवात रविवारी करणार आहे. पहिल्याच मॅचमध्ये  भारतीय क्रिकेट टीमची टक्कर पाकिस्तानशी (India vs Pakistan) होईल.

टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) टीम इंडिया (Team India) आपल्या अभियानाची सुरुवात रविवारी करणार आहे. पहिल्याच मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमची टक्कर पाकिस्तानशी (India vs Pakistan) होईल.

टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) टीम इंडिया (Team India) आपल्या अभियानाची सुरुवात रविवारी करणार आहे. पहिल्याच मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमची टक्कर पाकिस्तानशी (India vs Pakistan) होईल.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) टीम इंडिया (Team India) आपल्या अभियानाची सुरुवात रविवारी करणार आहे. पहिल्याच मॅचमध्ये  भारतीय क्रिकेट टीमची टक्कर पाकिस्तानशी (India vs Pakistan) होईल. दुबईतील मैदानात ही मॅच होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय टीम ग्रुप स्टेजमधील 5 पैकी 4 मॅच दुबईत खेळणार आहे. तर अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव सामना अबूधाबीत होईल. गेल्या 11 वर्षांपासून यूएई पाकिस्तानचं होम ग्राऊंड आहे. मात्र गेल्या दोन वर्षात या पिचवर भारतीय खेळाडूंना चांगलाच अनुभव मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीमना या मैदानाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे पिचच्या हिशेबानं रणनिती तयार करणे त्यांना फारसे अवघड जाणार नाही. या पिचचा रेकॉर्ड काय आहे ते पाहूया... कुणाचा असेल बोलबाला? गेल्या काही वर्षांचा रेकॉर्ड पाहिला तर हे पिच फारसे बदलले नाही. काही पिच स्लो आहेत. तर काहींवर फास्ट बॉलर्सला मदत मिळते. गेल्या दोन आयपीएल सिझनमधील येथील सरासरी स्कोअर 150 ते 160 आहे.  इथं फास्ट बॉलर्स हे जास्त यशस्वी ठरलेत. त्यांना 27 रननंतर एक विकेट मिळाली आहे. तर स्पिनर्सना एका विकेटसाठी 32 रन मोजावे लागले आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम प्रत्येकी 3 फास्ट बॉलर्ससह मैदानात उतरु शकतात. दुबईच्या पिच लोकेशनची देखील नेहमी चर्चा होते. हे पिच स्कॉयर जवळ आहे. त्यामुळे एका बाजूला बाऊंड्री लहान आहे. त्यामुळे बॅटर या बाजूला टार्गेट करु शकतात. त्यामुळे त्या साईडनं बॉलिंग करणे सोपे नसेल. विशेषत: स्पिनर्सना त्या बाजूनं बॉलिंग देणं ही कॅप्टनसाठी डोकेदुखी ठरणार आहे. लहान बाऊंड्रीला टार्गेट करण्यासाठी लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनसह मैदानात उतरण्याचा प्रत्येक टीमचा प्रयत्न असेल. T20 World Cup: 'बुमराहपुढे शाहीन आफ्रिदी बच्चा,' पाकिस्तानच्या फास्ट बॉलरनं दिली कबुली टॉसचा रोल मेन वर्ल्ड कपमधील या मॅचमध्ये टॉसचा रोल मेन असेल. यूएईमध्ये हवामान बदलत आहे. इथं संध्याकाळी दव पडल्यानं मैदानात दवबिंदू पडतात. आयपीएल 2020 च्या पहिल्या हाफमध्ये इथं उष्ण वातावरण होते. त्यामुळे टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमनं 77 टक्के मॅच जिंकल्या होत्या. दुसऱ्या हाफमध्ये मात्र याच्या उलट चित्र दिसलं. या हाफमध्ये नंतर बॅटींग करणाऱ्या टीमनं 77 टक्के मॅच जिंकल्या. धोनीमुळे बदललं 'या' खेळाडूचं नशीब, एक फोन कॉलमुळे झाली टीम इंडियात एन्ट्री टीम इंडिया वरचढ दुबईमध्ये टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये चार मॅच खेळणार आहे. आयपीएल स्पर्धेमुळे या पिचचा भारतीय खेळाडूंना चांगलाच परिचय झाला आहे. कॅप्टन विराट कोहलीकडं (Virat Kohli) सर्व प्रकारच्या रणनीतीला पूरक असे खेळाडू आहेत. त्यामुळे पिचच्या हिशेबानं प्लेईंग 11 तयार करण्यात टीम इंडियाला जास्त अडचण येणार नाही.
First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup

पुढील बातम्या