• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर 1000 कोटींचा सट्टा, Fixing च्या भीतीनं तपासयंत्रणा अलर्ट

T20 World Cup: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर 1000 कोटींचा सट्टा, Fixing च्या भीतीनं तपासयंत्रणा अलर्ट

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) बहूप्रतीक्षीत लढत रविवारी होणार आहे. या मॅचमध्ये भारताची लढत पाकिस्तानशी (India vs Pakistan) होईल. या मॅचवर जगभरातील क्रिकेट फॅन्ससह सर्व बुकींचंही लक्ष आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) बहूप्रतीक्षीत लढत रविवारी होणार आहे. या मॅचमध्ये भारताची लढत पाकिस्तानशी (India vs Pakistan) होईल. या मॅचवर जगभरातील क्रिकेट फॅन्ससह सर्व बुकींचंही लक्ष आहे. या मॅचवर आजवर 1000 कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे. सट्टा बाजारानं टीम इंडियाला विजयासाठी पहिली पंसती दिली आहे. या मॅचच्या टॉसनंतर सट्टा बाजार 1500 ते 2000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दुबईत जगभरातील अनेक बडे बुकी उपस्थित आहेत. भारताचा रेट सध्या 57,58 आहे. ऑनलाईन बेटींग्स साईटच्या माध्यमातून जगभरातील सर्व बड्या आणि हायप्रोफाईल सट्टेबाजांनी या मॅचवर पैसा लावला आहे. बीसीसीआयच्या एंटी करप्शन युनिटचे वरीष्ठ अधिकारी सध्या यूएईमध्ये आहेत. त्यांचं प्रत्येक मॅचवर बारीक लक्ष आहे. 'आमचे अधिकारी आणि लोकल एजन्सींचं प्रत्येक हलचालींवर लक्ष आहे. त्यामध्ये खेळाडूंच्या सुरक्षेचाही मुद्दा आहे.' असं या एजन्सीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. अंडरवर्ल्डचीही नजर भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यावर दुबईतील अंडरवर्ल्डचीही नजर आहे. क्रिकेट आणि त्यातही भारत-पाकिस्ताम मॅच हा येथील अंडरवर्ल्डचा आवडीचा विषय आहे. या मॅचवर खूप मोठ्या प्रमाणात सट्टा लागल्यास बुकी काही प्लेयर्सच्या माध्यमातून मॅच फिक्स करण्याचीही शक्यता असते. त्या परिस्थितीमध्ये BCCI आणि ICC च्या एंटी करप्शन युनिटचं प्रत्येक खेळाडूंवर विशेष लक्ष आहे. T20 World Cup: 'तू धोनी आहेस तर मी...' धोनीला पाहताच पाकिस्तानच्या बॉलरची प्रतिक्रिया VIDEO भारतामध्येही क्राईम ब्रँचच्या सायबर युनिटचं सर्व सट्टेबाजारांवर तसेच या प्रकारच्या साईट्सवर बारीक लक्ष आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एंटी करप्शन युनिटच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: