मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: हरभजन सिंगनं पुन्हा मोहम्मद आमिरला झापलं, Video Share करत केली कानउघाडणी

T20 World Cup: हरभजन सिंगनं पुन्हा मोहम्मद आमिरला झापलं, Video Share करत केली कानउघाडणी

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच झाल्यापासून हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि मोहम्मद आमिर (Mohammad Amir) यांच्यात वाद सुरू आहे.

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच झाल्यापासून हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि मोहम्मद आमिर (Mohammad Amir) यांच्यात वाद सुरू आहे.

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच झाल्यापासून हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि मोहम्मद आमिर (Mohammad Amir) यांच्यात वाद सुरू आहे.

मुंबई, 28 ऑगस्ट: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅच झाल्यापासून हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि मोहम्मद आमिर (Mohammad Amir) यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये ट्विटरवर जोरदार वाद (Twitter War) झाला. त्या वादामध्ये आमिरनं सभ्य भाषेची मर्यादा ओलांडली. त्यानंतर हरभजननं व्हिडीओ शेअर करत पाकिस्तानच्या बॉलरची कानउघाडणी केली आहे.

आमिर कुठून आला?

हरभजन यावेळी म्हणाला की, 'पाकिस्ताननं चांगला खेळ केल्यानं आमचा पराभव झाला. ही बाब मी तेव्हाच मान्य केली. त्यानंतर ती गोष्ट तिथंच संपली. मी आणि शोएब अख्तर एकत्र काम करतो. आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. आमच्या दोघांमध्ये थट्टा मस्करी सुरु असते.

या मॅचमध्येही तेच झालं. एका ट्विटनंतर ती गोष्ट संपली. मोहम्मद आमिरनं त्यामध्ये अचानक हस्तक्ष्प केला. हा आमिर आहे तरी कोण? असा प्रश्न मी विचारतो. माझी आणि शोएबमधील चर्चा ट्विटरवरच संपली होती. पाकिस्तानच्या विजयानंतर आमिरनं ट्विटरवर विचारलं की टीव्ही तोडलास का? असं विचारलं. मी त्यावर नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर आमिरनं आक्षेपार्ह भाषा वापरत ट्विट केलं. मी त्यानंतर लॉर्डसमध्ये आमिरनं टाकलेल्या 'नो बॉल' वर प्रश्न विचारला. तिथं काय झालं हे सर्वांना माहिती आहे.'

टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कोचवर पाकिस्तानची नजर, विराटचा 'खास' व्यक्तीही स्पर्धेत

मला चिखलात जायचं नाही

हरभजन पुढे म्हणाला,  'मला चिखलात जायचं नाही. मी आमिरशी बोलावं इतकी त्याची लायकी नाही. मी त्याच्याशी जितका बोलले तितकी माझी पातळी खाली येईल. आमिरनं वर्ल्ड क्रिकेटला काळा डाग लावला आहे. तो कधीही धुतला जाणार नाही. ज्यानं स्वत:ला विकलं त्याला मी उत्तर देण्याची गरज नाही. पैशांसाठी जाणीवपूर्वक नो बॉल टाकणाऱ्या व्यक्तीसमोर मी डोकं फोडलं तर ते चूक असेल. तो उर्मट आहे, आणि उर्मटच राहणार.'

हरभजननं नंतर पाकिस्तान फॅन्सना म्हणाला, 'तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट करा. ती चांगलं खेळत आहे. आम्ही आमच्या टीमला सपोर्ट करणार. या वादात पडू नका. आमची टीम जिंदाबाद होती, आहे आणि राहणार.'

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup