मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: भारत -पाकिस्तान मॅचपूर्वीच भिडले क्रिकेटर, भज्जीनं केली शोएबची बोलती बंद

T20 World Cup: भारत -पाकिस्तान मॅचपूर्वीच भिडले क्रिकेटर, भज्जीनं केली शोएबची बोलती बंद

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅचचं काऊंट डाऊन आता सुरू झालं आहे. येत्या रविवारी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) ही लढत होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅचचं काऊंट डाऊन आता सुरू झालं आहे. येत्या रविवारी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) ही लढत होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅचचं काऊंट डाऊन आता सुरू झालं आहे. येत्या रविवारी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) ही लढत होणार आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मॅचचं काऊंट डाऊन आता सुरू झालं आहे. येत्या रविवारी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी टी20 वर्ल्ड कपमधील ही लढत होणार आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही देश एकमेकांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळणार आहेत. वन-डे वर्ल्ड कप प्रमाणेच टी20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.

या मॅचपूर्वी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंगची (Harbhajan Singh) ट्विटरवर कुरापत काढली होती. त्याला भज्जीनं चोख उत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे. हे दोन्ही खेळाडू नुकतेच एका टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर या वादाला सुरूवात झाली.

अख्तरनं हरभजनसोबतचा या कार्यक्रमाचा फोटो शेअर केला होता. तो फोटो शेअर करत अख्तरनं ट्विट केलं की, 'सर्व स्पर्धांमधील सर्वात मोठ्या मॅचवर चर्चा करण्यासाठी दुबईमध्ये  मिस्टर 'मला सर्व माहिती आहे' अशा हरभजनसिंग सोबत'

हरभजननंही याला उत्तर देताना अख्तरला त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील रेकॉर्डची आठवण करुन दिली. 'जेव्हा तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या असतील त्यावेळी माझी खात्री आहे की तुम्हाला क्रिकेटबद्दल 200 पेक्षा कमी विकेट्स घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त माहिती असेल, याची मला खात्री आहे.' असं ट्विट करत भज्जीनं अख्तरची बोलती बंद केली.

यापूर्वी हरभजननं शोएब अख्तरची थट्टा करत पाकिस्तानला या मॅचमध्ये जिंकण्याची कोणतीही संधी नाही, असं सांगितलं होतं. 'पाकिस्ताननं भारताविरुद्धची मॅच खेळूच नये. कारण ते आणखी एकदा हरणार आणि पुन्हा निराश होणार' असं हरभजननं म्हंटलं होतं.

T20 World Cup: भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी ट्विटरवर का ट्रेंड होतय #BoycottPakistan?

हरभजन आणि अख्तरमध्ये वाद होण्याची ही पहिली घटना नाही. क्रिकेटच्या मैदानावरही दोन्ही खेळाडू  अनेकदा एकमेकांना भिडले आहेत. अर्थात मैदानाच्या बाहेर आपण एकमेकांचे चांगले मित्र असल्याचा दोघांचाही दावा आहे.

First published:
top videos

    Tags: Harbhajan singh, Shoaib akhtar, T20 world cup