मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: 'तू धोनी आहेस तर मी...'प्रॅक्टीस एरियात धोनीला पाहताच पाकिस्तानच्या बॉलरची प्रतिक्रिया VIDEO

T20 World Cup: 'तू धोनी आहेस तर मी...'प्रॅक्टीस एरियात धोनीला पाहताच पाकिस्तानच्या बॉलरची प्रतिक्रिया VIDEO

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) दरम्यान होणाऱ्या मॅचचं काऊंटडाऊन सुरु झालंय. या मॅचपूर्वी धोनी पाकिस्तानच्या प्रॅक्टीस एरियात दाखल झाला होता.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 23 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) दरम्यान होणाऱ्या मॅचचं काऊंटडाऊन सुरु झालंय. दोन्ही देश या मॅचनं वर्ल्ड कपच्या अभियानाची सुरुवात करणार आहेत. या स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड एकतर्फी आहे. आजवर झालेल्या सर्व मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव केलाय. रविवारी होणाऱ्या महामुकाबल्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पाकिस्तानच्या प्रॅक्टीस एरियात दाखल झाल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

टीम इंडियाची प्रॅक्टीस संपल्यानंतर धोनी ग्राऊंडमधून हॉटेलमध्ये जात होता. त्याच रस्त्यावर पाकिस्तानचं प्रॅक्टीस ग्राऊंड आहे. धोनी प्रॅक्टीस ग्राऊंडवर गेला नाही. तर त्या भागातून जात होता. धोनीला तिथून जात असलेलं पाहून तिथं फिल्डिंग करत असलेला पाकिस्तानचा तरुण खेळाडू चांगलाच खूश झाला. धोनीला कसं बोलता येईल हा प्रश्न त्याला पडला होता.

पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहनवाज दहानी ( Shahnawaz Dahani) धोनी तिथून जात असताना बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत होता. धोनीला पाहताच त्यानं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. धोनीचं सुरुवातीला त्याच्याकडं लक्ष नव्हतं. त्यावेळी त्यानं हाक मारत स्वत:कडं लक्ष वेधलं. 'तू धोनी आहेस तर मी दहानी आहे', अशी त्यानं स्वत:ची ओळख करुन दिली. ते ऐकताच धोनीनं त्याला थम्सअप केलं.

कोण आहे दहानी?

शहनावाज दहानी हा 23 वर्षांचा पाकिस्तानचा फास्ट बॉलर आहे. त्यानं अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 18 टी20 मॅचमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) मुलतान सुलतानचा सदस्य असलेल्या दहानीची राखीव खेळाडू म्हणून पाकिस्तानच्या वर्ल्ड कप टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

धोनीला मिळाला नवा रोल, पाकिस्तान विरुद्ध होणार टीम इंडियाचा फायदा! पाहा Photos

First published:

Tags: India vs Pakistan, MS Dhoni, T20 world cup, Video