मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup, IND vs NZ: विराट कोहलीचं आठवभरात बदललं मत, जुन्या वक्तव्यावरून घुमजाव

T20 World Cup, IND vs NZ: विराट कोहलीचं आठवभरात बदललं मत, जुन्या वक्तव्यावरून घुमजाव

न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये (India vs New Zealand) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) टॉस हरला. टॉस हरल्यानंतर विराटनं केलेल्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये (India vs New Zealand) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) टॉस हरला. टॉस हरल्यानंतर विराटनं केलेल्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये (India vs New Zealand) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) टॉस हरला. टॉस हरल्यानंतर विराटनं केलेल्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई, 1 नोव्हेंबर: टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दुसऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंडकडून (India vs New Zealand) 8 विकेटनं पराभव झाला. भारतीय क्रिकेट टीमनं पहिल्यांदा बॅटींग करताना 110 रन केले होते. ते न्यूझीलंडनं 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) टॉस हरला. टॉस हरल्यानंतर विराटनं केलेल्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

टीम इंडियाच्या 2 मॅच दरम्यान आठवडाभर अंतर हास्यास्पद असल्याचं मत विराटनं टॉसवेळी व्यक्त केलं. या स्पर्धेत टीम इंडियानं पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी खेळली होती. त्यानंतर आठवडाभरानं 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध मॅच खेळली. हा खूप मोठा ब्रेक असल्याचं मत विराटनं व्यक्त केलं.

आठवडाभरात घुमजाव

पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) मॅचनंतर विराटनं ब्रेक टीम इंडियासाठी चांगला असल्याचं मत व्यक्त केलं होतं. 'आमचे खेळाडू आयपीएल खेळून आले आहेत. त्यामुळे सर्व भूमिकेतून हा ब्रेक चांगला ठरेल. आम्ही इंग्लंडमध्ये आव्हानात्मक क्रिकेट खेळलो. त्यानंतर यूएईमध्ये आयपीएल खेळलो आणि आता टी20 वर्ल्ड कप खेळत आहोत. या स्पर्धेतील मोठा ब्रेक आम्हाला फायदेशीर ठरेल.' असं विराटनं म्हंटलं होतं. न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर मात्र त्याचं हे मत बदललं आहे.

टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 110 रनच करता आल्या. रवींद्र जडेजा 19 बॉलमध्ये 26 रनवर नाबाद राहिला, तर हार्दिकने 23 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर ईश सोढीला 2 विकेट मिळाल्या. टीम साऊदी आणि एडम मिल्नेला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

T20 World Cup: IPL स्टार राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेल, दोन्हीच्या आकडेवारीत मोठा फरक

भारताने दिलेलं 111 रनचं आव्हान न्यूझीलंडने 14.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. डॅरेल मिचेलने 35 बॉलमध्ये 49 रन केले, तर केन विलियमसन 33 रनवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन्ही विकेट घेतल्या.

First published:

Tags: T20 world cup, Team india, Virat kohli