• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs NZ LIVE Streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत कधी आणि कुठे पाहता येणार?

IND vs NZ LIVE Streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत कधी आणि कुठे पाहता येणार?

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियासाठी आजचा (रविवार) दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय क्रिकेट टीमची रविवारी न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand) लढत होणार आहे.

  • Share this:
    दुबई, 31 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियासाठी आजचा (रविवार) दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय क्रिकेट टीमची रविवारी न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand) लढत होणार आहे. या दोन्ही टीमनं या स्पर्धेत पराभवानं सुरुवात केली आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेला पराभव विसरुन मैदानात उतरण्याचं आणि जिंकण्याचं आव्हान दोन्ही टीमसमोर असेल. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमसाठी ही मॅच 'करो वा मरो' स्वरुपाची आहे. या मॅचमध्ये पराभूत होणाऱ्या टीमचं वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानची टीम सलग तीन विजयासह अव्वल क्रमांकावर आहे. त्यांची सेमी फायनलमधील जागा ही नक्की झालीय. तर दुसऱ्या जागेसाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तीन टीममध्ये स्पर्धा आहे. टी20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात टीम इंडिया अद्याप एकदाही न्यूझीलंडला पराभूत करु शकलेली नाही. त्याचबरोबर दुबईत होणाऱ्या या मॅचमध्ये टॉस देखील निर्णायक ठरणार आहे. दुबईच्या मैदानात पडणाऱ्या दवमुळे सेकंड हाफमध्ये बॅटींग करणे अधिक सोपे होते. हा इतिहास लक्षात घेऊन टॉस जिंकणारी टीम पहिल्यांदा फिल्डिंग करण्यास पसंती देईल. किती वाजता सुरू होणार मॅच? भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील सामना 31 ऑक्टोबर रविवारी  दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल. कुठे होणार लाईव्ह प्रसारण? या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. IND vs NZ: पुन्हा तसंच घडलं तर....न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी विराटला सतावतेय भीती! जिओवरही पाहता येणार मॅच रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना या महामुकाबल्याची मॅचची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक भारत-पाकिस्तान मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना ही मॅच पाहता येतील. भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी न्यूझीलंडची टीम: केन विलियमसन (कॅप्टन), टोड अ‍ॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे,  मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट, ईश सोधी आणि टीम साउदी
    Published by:News18 Desk
    First published: