मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: IPL स्टार राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेल, दोन्हीच्या आकडेवारीत मोठा फरक

T20 World Cup: IPL स्टार राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेल, दोन्हीच्या आकडेवारीत मोठा फरक

टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर केएल राहुलनं (KL Rahul) आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) 626 रन केले होते. त्यानंतर लगेच होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) तो सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल असं मानलं जात होतं.

मुंबई, 1 नोव्हेंबर: टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर केएल राहुलनं (KL Rahul) आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) 626 रन केले होते. त्यानंतर लगेच होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) तो सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल असं मानलं जात होतं. पण या स्पर्धेतील पहिल्या दोन मॅचमध्ये तो फेल गेला आहे. रविवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (India vs New Zealand) राहुल 18 रन काढून आऊट झाला.

राहुलनं टी20 इंटरनॅशनलमधील मागील 12 इनिंगमध्ये फक्त 1 अर्धशतक झळकावलं आहे.  पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये तो 8 बॉलमध्ये 3 रन काढून आऊट झाला. राहुल न्यूझीलंड विरुद्ध इशान किशनसोबत ओपनिंगला उतरला होता. इशान किशन 4 रन काढून आऊट झाला तर 3 नंबरवर आलेल्या रोहित शर्मालाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. रोहित 14 रनवर आऊट झाला.

राहुलचा रेकॉर्ड

टी 20 इंटरनॅशनलमधील शेवटच्या 7 मॅचमध्ये राहुल 5 वेळा दोन आकडी रन करु शकलेला नाही. या दरम्यान तो 0,1,0,0,3 रन काढून आऊट झाला आहे. तर अन्य 2 इनिंगमध्ये त्यानं 14 आणि 18 रन केले आहेत. राहुलच्या एकूण टी20 इंटरनॅशनल करिअरचा विचार केला तर 47 इनिंगमध्ये 38 च्या सरासरीनं 1578 रन केले आहेत. यामध्ये त्यानं 2 शतक आणि 12 अर्धशतक झळकावली आहेत.

T20 World Cup, IND vs NZ: टीम इंडियाच्या जखमेवर आफ्रिदीनं चोळलं मीठ

केएल राहुलनं आयपीएलमधील मागील चार सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन काढले आहेत. त्यानं 2018 मध्ये 6 अर्धशतकांसह 659 रन काढले होते. 2919 साली एक शतर आणि 6 अर्धशतकांच्या मदतीनं 593 रन काढले. 2020 मध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकाच्या जोरावर 670, तर आयपीएल 2021 मध्ये 6 अर्धशतकांच्या जोरावर 626 रन काढले आहे. मागील 4 आयपीएल सिझनमध्ये त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.

First published:

Tags: Kl rahul, T20 world cup, Team india