मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NAM, Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IND vs NAM, Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सोमवारी भारत विरुद्ध नामिबिया (India vs Namibia) यांच्यात सुपर 12 मधील शेवटची मॅच होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सोमवारी भारत विरुद्ध नामिबिया (India vs Namibia) यांच्यात सुपर 12 मधील शेवटची मॅच होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सोमवारी भारत विरुद्ध नामिबिया (India vs Namibia) यांच्यात सुपर 12 मधील शेवटची मॅच होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर: टी 20 वर्ल्ड कपमध्ये सोमवारी भारत विरुद्ध नामिबिया (India vs Namibia) यांच्यात सुपर 12 मधील शेवटची मॅच होणार आहे. दोन्ही टीमचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे ही फक्त एक औपचारिक मॅच आहे. पण, या शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडियासारख्या दिग्गज टीमला कडवी झुंज देण्याचा नामिबियाचा प्रयत्न असेल. तर स्पर्धेचा समारोप दणदणीत विजयानं करण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाची ही शेवटची मॅच आहे. या प्रकारातील कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय विराटनं यापूर्वीच जाहीर केला आहे. तर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या कार्यकाळातील ही शेवटची मॅच आहे. या मॅचनंतर शास्त्री यांचा कार्यकाळ संपेल. शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विराटचा उत्तराधिकारी म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची नावं चर्चेत आहेत.

या वर्ल्ड कपमध्ये नामिबियानं 4 पैकी 1 तर टीम इंडियानं 4 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत.

IND vs NAM Dream11 Team Prediction:

कॅप्टन - रोहित शर्मा

व्हाईस कॅप्टन - केएल राहुल

विकेटकिपर - ऋषभ पंत

बॅटर्स - केएल राहुल, रोहित शर्मा गेरहार्ड इरास्मस, स्टीफन बार्ड

ऑल राऊंडर्स - रविंद्र जडेजा, डेव्हिड विसे

बॉलर्स - जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर. अश्विन, रूबेन ट्रम्पेलमॅन

विराटची होणार होती टीम इंडियातून हकालपट्टी! वाचा कुणामुळे वाचली कोहलीची जागा

भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

स्कॉटलंडची टीम: गेरहार्ड इरास्मस (कॅप्टन), स्टीफन बार्ड, मिचौ डू प्रीज, जान फ्रिलिंक, कार्ल बिरकेनस्टॉक, जेन ग्रीन,बर्नार्ड शोल्ट्ज, निकोल लोफी-इटन, बेन शिकोंगो, जेजे स्मिथ, माइकल वॅन लिंगेन, डेव्हिड विसे, रूबेन ट्रम्पेलमॅन, क्रेग विलियम्स आणि  पिक्की या फ्रान्स

First published:

Tags: T20 world cup, Team india